चित्रनगरीचा टप्पानिहाय विकास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:06 IST2021-07-10T04:06:04+5:302021-07-10T04:06:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोरेगाव येथील चित्रनगरीचा (फिल्मसिटी) पायाभूत विकास करताना, टप्पानिहाय विकास करण्याबाबतचे नियोजन करावे, असे निर्देश ...

Develop Chitranagari in stages | चित्रनगरीचा टप्पानिहाय विकास करा

चित्रनगरीचा टप्पानिहाय विकास करा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गोरेगाव येथील चित्रनगरीचा (फिल्मसिटी) पायाभूत विकास करताना, टप्पानिहाय विकास करण्याबाबतचे नियोजन करावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी दिले.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची आढावा बैठक मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा, सहव्यवस्थापकीय संचालक आंचल गोयल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

चित्रनगरी विकासाचा बृहत् आराखडा तयार करताना पायाभूत विकासाला प्राधान्य देण्यात यावे. चित्रनगरीचा विकास करताना विविध माध्यमांसाठी असलेली आवश्यकता विचारात घ्यावी. चित्रनगरीमध्ये चित्रीकरणासाठी पायाभूत सुविधांतर्गत कलागारे, चित्रीकरण स्थळे विकासासाठी स्वारस्य अभिव्यक्तीअंतर्गत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना देशमुख यांनी दिल्या. या बैठकीत महामंडळाशी निगडित विविध मुद्द्यांबाबत चर्चा करण्यात आली.

Web Title: Develop Chitranagari in stages