शस्त्र तस्करी करणारा आरोपी अटकेत

By Admin | Updated: June 30, 2017 03:13 IST2017-06-30T03:13:18+5:302017-06-30T03:13:18+5:30

परराज्यातून शस्त्रसाठा आणून त्याची मुंबईत विक्री करणाऱ्या एका आरोपीला दादर आरपीएफने बुधवारी अटक केली. रवींद्र पवार (३०) असे या आरोपीचे नाव असून,

Detained accused smuggled weapons | शस्त्र तस्करी करणारा आरोपी अटकेत

शस्त्र तस्करी करणारा आरोपी अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परराज्यातून शस्त्रसाठा आणून त्याची मुंबईत विक्री करणाऱ्या एका आरोपीला दादर आरपीएफने बुधवारी अटक केली. रवींद्र पवार (३०) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून आरपीएफने दोन रिव्हॉल्व्हर आणि २२ काडतुसे हस्तगत केली आहेत.
मूळचा कुर्ला परिसरातील राहणारा हा आरोपी बुधवारी सकाळी दादर रेल्वे स्थानकात दाखल झालेल्या पंजाब मेलमधून बाहेर पडला. त्यानंतर रेल्वे स्थानकात गस्तीवर असलेल्या पोलिसांना चुकवून तो बाहेर पडण्याच्या तयारीत होता. या वेळी दादर आरपीएफचे नितीन मेस्त्री आणि अजय भोसले यांना या आरोपीवर संशय आल्याने त्याला थांबवत त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता त्यात दोन रिव्हॉल्व्हर आणि २२ काडतुसे आढळली. आरपीएफने या आरोपीला दादर रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Web Title: Detained accused smuggled weapons