सेक्स रॅकेट उद्ध्वस्त
By Admin | Updated: June 18, 2016 01:28 IST2016-06-18T01:28:15+5:302016-06-18T01:28:15+5:30
स्पा अॅण्ड सलूनच्या नावाखाली सुरू असलेले सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यास चेंबूर पोलिसांना यश आले. या कारवाईत सहा मुलींची सुटका करीत स्पा मालकांसह मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

सेक्स रॅकेट उद्ध्वस्त
मुंबई : स्पा अॅण्ड सलूनच्या नावाखाली सुरू असलेले सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यास चेंबूर पोलिसांना यश आले. या कारवाईत सहा मुलींची सुटका करीत स्पा मालकांसह मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.
चेंबूर येथील एका स्पा अॅण्ड सलूनमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती चेंबूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार चेंबूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एस.जी डाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकाऱ्यांनी या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांच्या येण्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तेथील कर्मचाऱ्यांचीही पळापळ सुरू झाली. या कारवाईत पोलिसांनी सहा तरुणींची सुटका केली. तसेच येथील महिला, स्पा मालक आणि व्यवस्थापकाला अटक केली. अडीच वर्षांपासून हे सुरू असल्याची माहिती तपासात समोर आली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे चेंबूर पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)