सेनेची सत्ता असूनही मीनाताई उद्यानाची एैशी की तैशी

By Admin | Updated: May 15, 2014 00:47 IST2014-05-15T00:47:55+5:302014-05-15T00:47:55+5:30

शिवसेनेचे दैवत मानल्या जाणार्‍या ठाकरे कुटुंबियाच्या स्मृत्यर्थ उभारलेल्या उद्यानांची कशी एैशी की तैशी होते आहे हे पहायचे असेल तर नवीन माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मृती उद्यानाला जरूर भेट द्यावी.

Despite the power of the army, Ihati's skyline of Meenatai garden | सेनेची सत्ता असूनही मीनाताई उद्यानाची एैशी की तैशी

सेनेची सत्ता असूनही मीनाताई उद्यानाची एैशी की तैशी

स्नेहा पावसकर, ठाणे - महापालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी तिचा वापर करून शिवसेनेचे दैवत मानल्या जाणार्‍या ठाकरे कुटुंबियाच्या स्मृत्यर्थ उभारलेल्या उद्यानांची कशी एैशी की तैशी होते आहे हे पहायचे असेल तर नवीन माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मृती उद्यानाला जरूर भेट द्यावी. जुन्या मॉंसाहेब मीनाताई ठाकरे उद्यानासमोर नवीन मीनाताई ठाकरे बालोद्यान उभारण्यात आले. या उद्यानाचे २०१३ मध्येच नूतनीकरण करण्यात आले होते. त्याची वर्षभरात पार वासलात लागली आहे. सावरकरनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील लहान मुलांना खेळता यावे या उद्देशाने हे बालोद्यान उभारण्यात आले होते. जानेवारी २००० मध्ये तत्कालीन शिवसेना ठाणे जिल्हासंपर्क प्रमुख आनंद दिघे यांच्या हस्ते आणि महापौर रमेश वैती यांच्या उपस्थितीत या बालोद्यानाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा सुमारे १२ वर्षानंतर नूतनीकरण करून ६ जानेवारी २०१३ रोजी या नूतनीकृत उद्यानाचा शुभारंभ आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. मुलांना खेळण्यासाठी या उद्यानात सीसॉ, चक्रे, झोपाळे, घसरगुंडी अशी खेळणी असून त्यापैकी सी सॉ तुटलेली तर घसरगुंडी गंजलेल्या अवस्थेत आहे. उद्यानाला बसवण्यात आलेली संरक्षक जाळीसुद्धा तुटलेली आहे. त्यामुळे येथून रात्रीच्या वेळी प्रवेश करून उद्यानात आसरा घेणार्‍या गर्दुल्यांची संख्या वाढत चालली आहे. उद्यानात मुलांना बागडण्यासाठी लॉनसुद्धा नाही. बालोद्यानात येणार्‍या मुलांची संख्या जरी मोठी असली तरी या उद्यानाच्या प्रवेशद्वाराशेजारीच साचलेल्या कचर्‍यांच्या ढीगांमुळे उद्यानात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे लहान मुलांना उद्यानात घेऊन येण्याबाबत मात्र स्थानिकांमध्ये नाराजी दिसते. सत्ताधारी पक्षाला दैवता समान असणार्‍या माँच्या स्मरनार्थ उभारलेल्या या उद्यानात सत्ताधार्‍यांच्या कल्पना दारिद्य्राचे दर्शन घडते. त्यामध्ये कोणतेही नाविन्य नाही, कसलेही आकर्षण नाही केवळ फीत कापून, कोनशीला बसवून फोटोत झळकणे एवढ्याच हेतूने हे उद्यान साकारले की काय? असा प्रश्न रहिवाशांना आहे.

Web Title: Despite the power of the army, Ihati's skyline of Meenatai garden