दिवा जंक्शन असूनही जलद लोकल नाही

By Admin | Updated: August 4, 2014 00:33 IST2014-08-04T00:33:39+5:302014-08-04T00:33:39+5:30

दिवा म्हटले की, अनधिकृत बांधकामांचे माहेरघर अशीच त्याची काहीशी व्याख्या केली जाते

Despite the Diva Junction there is no fast locals | दिवा जंक्शन असूनही जलद लोकल नाही

दिवा जंक्शन असूनही जलद लोकल नाही

सुशांत मोरे, मुंबई
दिवा म्हटले की, अनधिकृत बांधकामांचे माहेरघर अशीच त्याची काहीशी व्याख्या केली जाते. मात्र, दिवा पूर्वी असे नव्हते. गेल्या दहा ते पंधरा वर्षांत दिवा येथे अनधिकृत बांधकामांचे पेव फुटत गेले आणि त्यामुळे लोकवस्ती आणखीच वाढत गेली. अशा या दिव्यात लोकसंख्या वाढत गेल्यामुळे रेल्वे सेवा खूप महत्त्वाची झाली आहे. मात्र, दिवा आता जंक्शन असूनही या स्थानकाला जलद लोकल नाही.
दिवा-पनवेल जंक्शन ३१ आॅक्टोबर १९६४ रोजी मालगाड्या आणि २८ डिसेंबर १९६४ रोजी प्रवासी वाहतुकीसाठी सुरू झाले. या तऱ्हेने हार्बर लाइनच्या टर्मिनससारखा दर्जा ठेवणाऱ्या पनवेलला दिवा पहिल्यापासूनच जोडलेले आहे. याशिवाय, दादर आणि परेलला सोडून पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या मध्य रेल्वेवरील अन्य स्टेशनमध्ये दिवा जंक्शन आहे. कोकण आणि दक्षिणेला जाणाऱ्या ट्रेन मुंबईच्या उपनगरीय सेवांना अडथळा न करता याच ठिकाणाहून वसईमार्गे गुजरातच्या दिशेने जातात. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा प्रवास सुकर होतो.
दिवा जंक्शन जरी असले तरी जवळपास पाच लाख लोकसंख्या असलेल्या दिव्यातील प्रवाशांना कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवलीहून येणाऱ्या ट्रेनमुळे चढता येत नाही.
मध्य रेल्वेच्या उपनगरांतील प्रवाशांना जर पश्चिम उपनगरांत जायचे असेल तर वसई-दिवा मार्ग दादरपर्यंतचा प्रवास आणि अनेक समस्यांपासून वाचवते. सध्या वसई आणि तेथूनच दिवा परतीच्या प्रवासासाठी इथे दिवसाला चारपेक्षा जास्त ट्रेन अपडाऊन करतात. एमयूटीपीअंतर्गत दिवा-ठाणे अतिरिक्त जोडणाऱ्या मार्गांना मंजुरी मिळाली आणि दिव्यातील रेल्वे विकासाचा मार्ग पुढे सरकत गेला. तसेच सध्या दिव्याहून बाहेरगावाला जाण्यासाठी ट्रेनही आहेत, मडगाव आणि रोहा पॅसेंजऱ अरबी समुद्राच्या एका बाजूला दिवा २२ छोट्या गावांनी वसलेले आहे.

Web Title: Despite the Diva Junction there is no fast locals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.