Join us  

MNS Dahi Handi: कोरोना असला तरी यंदा विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार, मनसेचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 5:17 PM

MNS Thane Dahihandi: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) कोणत्याही परिस्थितीत दहिहंडी साजरी करण्याचा निर्धार केलेला दिसतो आहे.

MNS Thane Dahihandi: कोरोनाचं संकट असल्यामुळे राज्यात सर्व सण आणि उत्सवांवर गेल्या वर्षीपासून बंधनं आली आहेत. दहीहंडीवरही गेल्या वर्षी कोरोनामुळे गंडांतर आलं होतं. पण यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) कोणत्याही परिस्थितीत दहिहंडी साजरी करण्याचा निर्धार केलेला दिसतो आहे. कारण मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर याबाबतची घोषणा केली आहे. ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार असल्याचं अभिजित पानसे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. यात त्यांनी ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचंही नाव नमूद केलं आहे. 

कोरोनाचे सर्व नियम पाळून दहीहंडी साजरी करण्याचा मनसेचा मानस असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी अनेक मंडळांना आवाहन देखील करण्यात आलं आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन दहिहंडी उत्सवात सामील होण्यासाठी एकत्र या आणि आपला मराठी सण साजरा करा, असं आवाहन अभिजित पानसे यांनी केलं आहे. मनसेच्या या निर्धारामुळे आता राज्यात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. 

ठाणे जिल्हा दहीहंडीसाठी लोकप्रिय आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक असा विविध जिल्ह्यांतून दहिहंडी पथकं ठाण्यात दाखल होत असतात. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी दहिहंडी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शुकशुकाट पाहायला मिळाला होता. पण आता मनसेच्या भूमिकेनं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकार आणि पोलीस याबाबत काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

टॅग्स :दहीहंडीमनसेअविनाश जाधवराज ठाकरे