Join us
Daily Top 2Weekly Top 5

उपमहापौर संजय घाडी यांचा प्रभाग अखेर चकाचक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:58 IST

संत ज्ञानेश्वर मार्ग व अशोक वन या परिसरात सखोल स्वच्छता करण्यात आली. यावेळी पाण्याच्या टँकरने रस्ते व पदपथ धुऊन स्वच्छ करण्यात आले.

मुंबई : उपमहापौर संजय घाडी यांचा प्रभाग क्र. ५ अशोकवन-चिंतामणी नगर चकाचक करण्यात आला आहे. या प्रभागात अस्वच्छता असल्याबाबत ‘रस्ते खोदले, मलब्याचे ढीग... रोज धुळीशी सामना’ या मथळ्याखाली उपमहापौरांचा वॉर्ड रिपोर्ट ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाला होता.  या वृत्ताची दखल घेत आर उत्तर विभागाचे सहायक  आयुक्त नयनिश वेंगुर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवत परिसर चकाचक केला.

संत ज्ञानेश्वर मार्ग व अशोक वन या परिसरात सखोल स्वच्छता करण्यात आली. यावेळी पाण्याच्या टँकरने रस्ते व पदपथ धुऊन स्वच्छ करण्यात आले. यावेळी २० टन गाळ, कचरा, ऑड आर्टिकल्स, अनधिकृत फलक हटवून ३६ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. स्वच्छता मोहिमेमध्ये पालिकेचे ४० कामगार, ५ अभियंते सहभागी झाले होते. एक जेसीबी, चार डंपर, एक पाण्याचा टँकरचा वापर करण्यात आला होता.

वाहतूककोंडी सोडवणार -नॅन्सी कॉलनी एस.टी. डेपो परिसरात होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणाबाबत  लवकरच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेणार आहोत. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांबरोबर बैठक घेणार असल्याचे घाडी यांनी सांगितले. यावेळी प्रवक्त्या संजना घाडी, शाखाप्रमुख विद्या पोतदार, युवासेना विधानसभा समन्वयक सुयश घाडी आदी उपस्थित होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Deputy Mayor's Ward Finally Gleaming After 'Lokmat' Report

Web Summary : Following a 'Lokmat' report highlighting unsanitary conditions, Deputy Mayor Sanjay Ghadi's ward underwent a major cleanup. The administration, under Assistant Commissioner Vengurlekar, removed tons of waste, unauthorized stalls, and illegal hoardings. Ghadi plans to address traffic congestion and pollution issues soon.
टॅग्स :मुंबई