जमा-खर्च संशयाच्या भोव:यात
By Admin | Updated: August 10, 2014 00:13 IST2014-08-10T00:13:29+5:302014-08-10T00:13:29+5:30
रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेल्या ठाणो महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत खर्च केल्या जाणा:या लाखो रुपयांचा ताळेबंद उपलब्ध करून देण्यासाठी वारंवार मागणी विरोधकांकडून केली गेली आहे

जमा-खर्च संशयाच्या भोव:यात
>अजित मांडके ल्ल ठाणो
रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेल्या ठाणो महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत खर्च केल्या जाणा:या लाखो रुपयांचा ताळेबंद उपलब्ध करून देण्यासाठी वारंवार मागणी विरोधकांकडून केली गेली आहे. परंतु, 25 वर्षानंतरही हा ताळेबंद प्रशासनाने उपलब्ध करून दिला नसल्याने याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, मागील काही वर्षाचा विचार केल्यास विरोधकांनीसुद्धा यावर बहिष्कार टाकल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे त्यांनी वारंवार ताळेबंद सादर करण्याची मागणी केली आहे. परंतु आजही तो सादर केलेला नाही. परंतु काँग्रेसचे नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी या संदर्भात माहितीचा अधिकार टाकला असता, यातील अनेक बाबी समोर आल्या आहेत.
घाडीगावकर यांनी मागील तीन वर्षाचा जमा-खर्चाचा तपशील मागितला होता. तसेच अडीच वर्षाचे व्यवहार रोखीने करण्यात आले होते, हे व्यवहार कोणत्या नियमांतर्गत करण्यात आले आदीची माहिती मागितली होती. परंतु, ही बाब पालिका प्रशासनाशी संबंधित नसल्याचे सांगून पालिकेने यातून हात वर केल्याचेच दिसत आहे. तर 2क्1क्-11 पासून कोणकोणत्या संस्था व व्यक्तींकडून देणग्या आलेल्या
आहेत, त्यांचे नाव, त्या कोणत्या स्वरूपात आल्या होत्या, त्यास देण्यात आलेली मंजुरी, देयकांसह वर्षनिहाय माहिती मागितली होती. परंतु पालिकेने तशा स्वरूपाने कोणत्याही संस्थेकडून अथवा व्यक्तीकडून वैयक्तिक देणगी स्वीकारली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर पालिकेने दिलेल्या माहितीपत्रतील 762853 व 76286क्च्या धनादेशाच्या वितरणाची माहितीही त्यांनी मागितली होती. परंतु पालिकेने ही बाब कार्यालयाशी संबंधित नसल्याचे स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे पालिकेकडून मॅरेथॉन स्पर्धेसाठी लाखोंची तरतूद केली जात असतानासुद्धा माहिती अधिकारात याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे उत्तर प्रशासनाने दिल्याने या स्पर्धेच्या जमा -खर्चाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यातही तीन वर्षाची माहिती मागितली असताना केवळ पालिकेने त्यांना एक वर्षाची माहिती दिली आहे. त्यातही बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असलेले खाते हे मॅरेथॉनच्या वेळेसच उघडले जाते आणि पुन्हा स्पर्धा संपल्यावर ते बंद केले जात असल्याची बाबही समोर आली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षाचा बँकेतील लेखाजोखा पाहिला असता, प्रायोजकत्वाच्या माध्यमातून 13 लाख 1 हजार 279 रुपये जमा झाल्याचे दिसत असून त्यातील 12 लाख 75 हजार रुपये खर्च झाले आहेत. तर एका दिवसात पुन्हा 5 लाख 26 हजार 279 जमा झाल्याचे दिसत असून पुन्हा खात्यातून 5 लाख 25 हजार काढल्याचे दिसत आहे. त्यानुसार खात्यात 1 हजार 279 शिल्लक राहिल्याचे दिसून आले.
त्यानंतर अखेरीस खात्यात
अशा प्रकारे जमा, खर्च करून 48क् रुपये शिल्लक राहिल्याचे दिसून आले. परंतु तेसुद्धा काढण्यात
आले असून क् बॅलेन्सवर हे खाते
बंद केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हे 48क् रुपये गेले कुठे याचीसुद्धा माहिती उपलब्ध होऊ शकलेली
नाही. त्यामुळेच स्पर्धेच्या जमा-खर्चाबाबत संशयाचे धुके अधिक गडद झाले आहे.
च्ठाणो महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा यंदा 25 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या स्पर्धेत यंदा 25 हजार स्पर्धक सहभागी होतील, असा दावा पालिकेने केला आहे.
च्परंतु पालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याने यंदा महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी खासगी प्रायोजकांचा आधार घेऊन ही स्पर्धा घेण्याचे निश्चित केले आहे. यंदा यासाठी पालिकेच्या तिजोरीत 4क् लाखांची तरतूद केली आहे. त्यामुळे यंदा तरी या निधीचा योग्य तो वापर होईल का, असा प्रश्न नागरिकांतून व्यक्त होत आहे.