मुंबई - सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण आहे. महाराष्ट्रात बेकायदा बांगलादेशी स्थलांतरितांची संख्या मोठी आहे.
अनेक ठिकाणी अनियंत्रित रोजगार क्षेत्रात बांगलादेशी काम करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खोट्या कागदपत्रांच्या आधारे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिंदेसेनेचे खा. मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राज्य सरकारने बेकायदा बांगलादेशी स्थलांतरितांची तपासणी करणे अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले.