पनवेलमध्ये अवतरली सिटी बस

By Admin | Updated: May 22, 2014 03:43 IST2014-05-22T03:43:04+5:302014-05-22T03:43:04+5:30

केंद्र शासनाच्या यू.आय. डी. एस. एस. एम.टी. योजनेंतर्गत पनवेल शहर बससेवा येत्या काही महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे.

Depending on the City Bus in Panvel | पनवेलमध्ये अवतरली सिटी बस

पनवेलमध्ये अवतरली सिटी बस

पनवेल : केंद्र शासनाच्या यू.आय. डी. एस. एस. एम.टी. योजनेंतर्गत पनवेल शहर बससेवा येत्या काही महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे. पनवेल नगरपालिका जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निविदा उघडणार आहे. बससेवा पुरविण्याकरिता त्याचबरोबर बससेवा चालविण्याकरिता दोन स्वतंत्र एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहेत. यासाठी टाटा आणि अशोक लेलँड कंपनी इच्छुक असून मंगळवारी ही बस पनवेलकरांना दाखविण्यासाठी आणण्यात आली होती. पनवेल शहरालगत सिडकोने नवीन पनवेल, कळंबोली, कामोठा आणि खारघर या वसाहती वसवल्या. हे सर्व नोड विकसित झाले असून नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याठिकाणी अंतर्गत प्रवास करण्यासाठी तीन आसनी रिक्षांशिवाय दुसरे साधन नाही. दुसरा पर्याय नसल्याने रिक्षावाले मनाला वाटेल त्याप्रमाणे भाडे आकारतात. मीटर डाऊन कागदावर असून पनवेलकरांची मोठ्या प्रमाणात लूट होते. अंतर्गत प्रवासासाठी स्वस्त पर्याय असावा, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरत आहे. प्रशांत ठाकूर नगराध्यक्ष असताना त्यांनी सिटी बससेवा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मांडला होता. मात्र त्यानंतर हा मुद्दा काहीसा पाठीमागे पडला. २१ सप्टेंबर २०१३ रोजी पालिकेने बससेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्याकरिता निविदा प्रसिध्द करण्यात आल्या. अर्बन मास ट्रॅनशीट कंपनी या एजन्सीची ५ आॅक्टोबर रोजी निवड करून ७ आॅक्टोबर रोजी कार्यादेश देण्यात आले. या कंपनीला एकूण प्रोजेक्ट खर्चाच्या १.५ टक्के व त्यावर सेवा कर याकरिता स्थायी समितीने मंजुरी दिली होती. या परिपूर्ण प्रस्तावाला संबंधित कमिटीने त्वरित हिरवा कंदील दाखवला. मार्च महिन्यात पालिकेने निविदा प्रसिध्द केल्या. याकरिता अनेक कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. मंगळवारी अशोक लेलँड कंपनीने एक सफेद रंगाची बस पनवेलमध्ये पाठवली. आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्षा चारुशीला घरत यांच्यासह पालिकेच्या अधिकार्‍यांनी या बसची पाहणी केली. दिवाळीपर्यंत पनवेल परिसरात सिटी बस धावतील, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Depending on the City Bus in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.