Join us

पहिल्या वर्षी ५ लाख युवकांना रोजगार देणार; मंत्री लोढा यांनी स्वीकारला कार्यभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 06:12 IST

येत्या १०० दिवसांसाठी माझ्या विभागाच्या कामांची रूपरेषा मुख्यमंत्र्यांना देणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्य विकासाची महाराष्ट्राला असलेली गरज ओळखली आणि त्याला नेहमीच महत्त्व दिले आहे. अगदी थोड्या कालावधीत म्हणजे येत्या १०० दिवसांसाठी माझ्या विभागाच्या कामांची रूपरेषा मुख्यमंत्र्यांना देणार आहे. पहिल्या वर्षात ५ लाख युवकांना रोजगार देण्याचे माझ्या विभागाचे लक्ष्य आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात मंत्री लोढा यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पुढील ५ वर्षांचे ध्येय गाठण्यासाठी आजपासूनच कार्याला सुरुवात करणार आहोत, असे सांगितले.

वर्ल्ड बँक प्रतिनिधींची घेतली बैठक

कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्री लोढा यांनी वर्ल्ड बँकेच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. वर्ल्ड बँकेने कौशल्य विकास विभागाला २,२०० कोटी रुपयांचे कर्ज  दिले आहे. त्यामुळे आवश्यक बाबींची पूर्तता करून कर्जाची रक्कम लवकरात लवकर विभागाला कशी मिळेल, यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

टॅग्स :मुंबईमंगलप्रभात लोढा