शाहिद कपूरच्या घरात डेंग्यूच्या अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2016 04:19 IST2016-09-17T04:08:57+5:302016-09-17T04:19:56+5:30

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर याच्या जुहू येथील घरात डेंग्यू पसरवणाऱ्या डासांच्या अळ्या आढळून आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

Dengue larvae in Shahid Kapoor's house | शाहिद कपूरच्या घरात डेंग्यूच्या अळ्या

शाहिद कपूरच्या घरात डेंग्यूच्या अळ्या

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १७ : बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर याच्या जुहू येथील घरात डेंग्यू पसरवणाऱ्या डासांच्या अळ््या आढळून आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. यानंतर पुन्हा एकदा उच्चभ्रू वस्त्यांमध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास हा विषय चर्चेला आला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून उच्चभ्रू वस्त्यांमध्ये महापालिका अधिकारी तपासणीसाठी गेल्यावर त्यांना मज्जाव केला जात होता. यंदाही अधिकाऱ्यांना हा अनुभव येत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिला डेंग्यूची लागण झाली असून डॉक्टरांनी तिला पुढील १० ते १५ दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. विद्या बालन ही जुहूतारा रोडवरील प्रणिती इमारतीत राहते. तिच्या घराची तपासणी केली तेव्हा अधिकाऱ्यांना तिथे डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या नाहीत.


पण, विद्या बालनच्या घराच्या वरती चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या मीरा पटेल यांच्या घरात दोन ठिकाणी डेंग्यूच्या डासांच्या अळ््या आढळल्या. तर, याच इमारतीत शाहीद कपूरचे घर आहे. त्याच्या खासगी तरणतलावात मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या अळ््या आढळल्या आहेत. त्यानंतर तत्काळ या अळ््या मारण्यात आल्या. या दोन्ही घरांवर महापालिकेच्या अधिनियम ३८१ बी नुसार कारवाई करण्यात आली आहे. यांना नोटीस पाठवण्यात आली असून यांना २ ते १० हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो.

जुहूतारा रोडवरील या इमारतीच्या तपासणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना आधी इमारतीत येण्यास मज्जाव करण्यात आला. महापालिकेकडून आल्याचे सांगूनही त्यांना इमारतीत प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने इमारतीत प्रवेश मिळवला आणि तपासणी केली.

Web Title: Dengue larvae in Shahid Kapoor's house