डॉक्टरांनाच डेंग्यूची लागण

By Admin | Updated: October 18, 2014 01:27 IST2014-10-18T01:27:18+5:302014-10-18T01:27:18+5:30

मुंबईत ऑक्टोबर महिन्यातही डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा वाढत असताना महापालिकेच्या केईएम, सायन आणि कूपर रुग्णालयांतील 7 डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले आहे.

Dengue infection is only for doctors | डॉक्टरांनाच डेंग्यूची लागण

डॉक्टरांनाच डेंग्यूची लागण

मुंबई : मुंबईत ऑक्टोबर महिन्यातही डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा वाढत असताना महापालिकेच्या केईएम, सायन आणि कूपर रुग्णालयांतील 7 डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले आहे.   
केईएम रुग्णालयातील 4 निवासी डॉक्टरांना, सायन  रुग्णालयातील 2 निवासी डॉक्टरांना आणि कूपर रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरला डेंग्यूची लागण झाली आहे. केईएम रुग्णालयातील बालरोग चिकित्सक विभागातील 2 निवासी डॉक्टर, फॉरेन्सिक विभाग आणि पीएसएम विभागातील प्रत्येकी एका निवासी डॉक्टरला, तर सायन रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागातील 2 निवासी डॉक्टरांनाही डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
डॉ. आर. एन. कपूर रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक्स विभागातील एका वरिष्ठ डॉक्टरलाही डेंग्यूची लागण झालेली आहे. सायन रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागातील दोन निवासी डॉक्टरांपैकी एक महिला डॉक्टर आहे. 
सायन रुग्णालयातील सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार, या निवासी डॉक्टरांची डेंग्यूची तपासणी पॉङिाटिव्ह आलेली आहे. मात्र अजूनही काही तपासण्यांचा अहवाल आलेला नाही. पावसाळ्य़ाच्या आधीपासूनच नायर, सायन आणि केईएम रुग्णालयात बांधकाम सुरू होते. यामुळे देखील या परिसरात डेंग्यूची लागण झाल्याचे सांगितले जात आहे. 
 ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवडय़ांतच मुंबईत डेंग्यूचे एकूण 86 रुग्ण आढळून आले होते. ऑक्टोबर 2क्13 मध्ये डेंग्यूचे फक्त 189 रुग्ण आढळले होते. सप्टेंबर 2क्14 मध्ये डेंग्यूचे एकूण 167 रुग्ण आढळले, तसेच सप्टेंबर 2क्13 मध्ये डेंग्यूचे 168 रुग्ण आढळूले होते. या आकडेवारीवरून असे दिसून येते की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. या वर्षी आतार्पयत डेंग्यूमुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)
 
घरातच डेंग्यूच्या डासांची पैदास होण्याचा धोका
च्डेंग्यूच्या डासांची पैदास ही स्वच्छ साठलेल्या पाण्यामध्ये होते. पावसाळ्य़ात घराबाहेरील अडगळीच्या सामानात पाणी साठल्यामुळे डेंग्यूचे डास वाढू शकतात. मात्र आता पाऊस नसतानाही डेंग्यू वाढतो याला मुख्य कारण हे घरात साठवले जाणारे पाणी हे आहे.
 
च्अनेक घरांमध्ये मनी प्लॅन्ट, फेंगशुईच्या वस्तू असतात़ यामधले पाणी साठून तर राहतेच, शिवाय ते बदललेदेखील जात नाही.  
च्एसीचे पाणी, कुंडय़ाखाली ठेवण्यात येणा:या प्लॅस्टिक डिश या ठिकाणी देखील पाणी साठून राहण्याचे प्रकार होत असतात. त्यामुळे डासांची पैदास होण्याचा धोका वाढतो, म्हणूनच हे पाणी 1 ते 2 दिवसांत बदलले पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणो आहे.
 
डेंग्यूने बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू
ठाणो : घोडबंदर येथील मानपाडा भागात असलेल्या एका सोसायटीमधील बारावर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या सोसायटीमधील आणखी पाच ते सात जणांना अशा प्रकारे डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
घोडबंदर भागातील अग्रवाल कम्पाउंडमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून 16 जणांना डेंग्यू, मलेरियाची लागण झाल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली. येथे राहणा:या एका बारावर्षीय मुलाला डेंग्यूची लागण झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु गुरुवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या परिसरात डेंग्यू, मलेरियाने डोके वर काढले असतानाही प्रशासनाने दखल घेतली नाही. महापालिका क्षेत्रत जानेवारी ते ऑगस्ट 2क्14 या कालावधीत 1187 मलेरियाचे, तर 19 डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. जूनर्पयत शहरात 687 मलेरियाचे रुग्ण होते. त्यानंतर दोन महिन्यांत आणखी 5क्क् रुग्णांची भर पडली. (प्रतिनिधी)

 

Web Title: Dengue infection is only for doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.