उच्चभ्रू वस्त्यांत वाढतोय डेंग्यू !
By Admin | Updated: November 1, 2014 01:26 IST2014-11-01T01:26:01+5:302014-11-01T01:26:01+5:30
शहरासह उपनगरांतील उच्चभ्रू वस्त्यांत डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती अधिक आहे. त्यामुळे महापालिकेने आता या वस्त्यांना टार्गेट करणो सुरू केले आहे.

उच्चभ्रू वस्त्यांत वाढतोय डेंग्यू !
मुंबई : शहरासह उपनगरांतील उच्चभ्रू वस्त्यांत डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती अधिक आहे. त्यामुळे महापालिकेने आता या वस्त्यांना टार्गेट करणो सुरू केले आहे. वेळीच काळजी घ्या, डेंग्यूच्या डासांची पैदास रोखा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
वातावरणात होणा:या बदलांमुळे डासांची पैदास अधिक प्रमाणात होते. नागरिक देखील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळेच डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पावसाळा संपल्यानंतर डेंग्यूच्या डासांची पैदास घरांमध्ये होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामुळे ही वाढ रोखण्यासाठी योग्य ती काळजी घ्या, असे आवाहन महापालिकेने केले आहे. पावसाळ्यादरम्यान घरांच्या आजूबाजूच्या परिसरात, छपरांवर, टायरमध्ये, जुन्या वस्तूंमध्ये पाणी साचून राहिल्याने डेंग्यूच्या डासांची पैदास होते. मात्र पावसाळा संपल्यावर घरांमध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होण्याच्या प्रमाणात वाढ होते. वांद्रे, खार, सांताक्रूझ, भायखळा, घाटकोपर, वरळी, प्रभादेवी, लोअर परळ या भागांमध्ये डेंग्यूच्या डासांचा फैलाव जास्त आहे. मुंबईमध्ये पुन्हा एकदा डेंग्यू आणि मलेरियाविषयी जनजागृतीचे काम सुरू केले आहे. टॅक्सी, रिक्षांद्वारे जनजागृती केली जात आहे.
छपरावरील प्लॅस्टिकमध्ये पाणी साचून राहते. हेदेखील डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीसाठी पूरक ठरत आहे. उच्चभ्रू वस्तीमध्ये डासांच्या उत्पत्तीचे प्रमाण वाढत आहे. घरांमध्ये असणारे फेंगशुईचे प्लॅण्ट, झाडाखाली ठेवलेली पेट्री डिश, फ्रीजमधील डिफ्रॉस्ट ट्रे आणि एसीमधून येणारे पाणी हे दिवसेंदिवस साचून राहिल्याने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढताना दिसत आहे. उच्चभ्रू वस्त्यांमध्ये पाणी अधिक काळ साठून राहणार नाही याबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन कीटकनाशक अधिकारी राजेंद्र नारिंगेकर यांनी केले आहे.
धूर फवारणीला सुरुवात
डिङोलच्या वाढलेल्या किमतीमुळे गेले आठ-दहा दिवस डिङोलचा तुटवडा जाणवला होता. यामुळे धूर फवारणी करणा:या यंत्रंमध्ये डिङोलचा तुटवडा जाणवत होता. याने काही प्रमाणात धूर फवारणी कमी झाली होती. निवडणुकीच्या काळात कर्मचा:यांची संख्यादेखील अपुरी होती.
मात्र आता सगळे प्रश्न सुटले असून, मुंबईत पुन्हा एकदा जनजागृती आणि धूर फवारणी सुरू केली आहे. केईएम रुग्णालय परिसरातील अव्यवस्थेविषयी संबंधितांना कारणो दाखवा नोटीस पाठवल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी दिली. (प्रतिनिधी)
च्माटुंगा लेबर कॅम्पमध्ये डेंग्यूने थैमान घातले असून महिन्याभरात डेंग्यूने अनेकांचा बळी घेतला आहे. लोकप्रतिनिधींनी पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली असून, गेल्या दोन दिवसांपासून पालिका प्रशासनाने विभागात धडक मोहीम हाती घेतली आहे.
च्मुंबईत डेंग्यूने थैमान घातले असून तो रोखण्यासाठी पालिका सर्वतोपरी प्रय} करत आहे.
माटुंगा लेबर कॅम्पबाबत माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी पालिकेचे जी/उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे पत्रव्यवहार करत विभागात युद्धपातळीवर आरोग्य तपासणी मोहिम राबविण्याची मागणी केली होती. याची दखल घेत प्रशासनाने माटुंगा लेबर कॅम्प परिसरात गुरुवारपासून विशेष मोहीम सुरू केली आहे.
च्पाणी साचून डासांची पैदास होत असल्याने जनजागृतीसाठी पालिकेने मोहीम हाती घेतली आह़े त्यानुसार टॅक्सी व रिक्षा व वृत्तपत्रंतून स्वच्छतेचे संदेश, रेडिओवरून माहिती देणो, होर्डिग्ज, मॉस्किटो मॅनच्या माध्यमातून जागृती सुरू आह़े
च्गुरुवारी पालिका अधिका:यांनी परिसरात घरोघरी जाऊन डेंग्यूबाबत जनजागृती
केली. शुक्रवारी पालिका अधिका:यांनी शाहू नगर परिसरामध्ये डेंग्यू निमरुलनासाठी विशेष मोहीम राबवली. माटुंगा लेबर कॅम्प परिसरात गेल्या महिनाभरात डेंग्यूमुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. डेंग्यू थैमानाकडे एकनाथ गायकवाड यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर पालिकेने विशेष मोहिम राबविली आहे.