कामोठय़ात डेंग्यूची साथ
By Admin | Updated: November 2, 2014 00:31 IST2014-11-02T00:31:53+5:302014-11-02T00:31:53+5:30
कच:यांचे साचलेले ढिग, अनियमित फवारणी, त्याचबरोबर तुंबलेली गटारे यामुळे कामोठय़ात स्वच्छतेचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे.

कामोठय़ात डेंग्यूची साथ
कामोठे : कच:यांचे साचलेले ढिग, अनियमित फवारणी, त्याचबरोबर तुंबलेली गटारे यामुळे कामोठय़ात स्वच्छतेचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. या परिसरात डेंग्यूची साथ पसरली असून गेल्या पंधरवडय़ात डेंग्यूचे एकूण दहा रुग्ण आढळले आहेत.
एकविसाव्या शतकातील विकसित शहर असे ब्रिद घेऊन सिडकोने वसाहती विकसित केल्या. त्यात कामोठे नोडचाही सहभाग आहे. पनवेल - सायन महामार्ग त्याचबरोबर मुंबई - पनवेल हार्बर लाईनच्या बाजूला असलेल्या कामोठे वसाहतीची लोकसंख्या वाढली आहे, मात्र या ठिकाणी पायाभूत सुविधा मात्र पुरेश्या प्रमाणात दिसत नाहीत. विशेषत: आरोग्याच्या दृष्टीने पूर्णत: या भागाकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. वसाहतीतील कचरा नियमित उचलला जात नसून घंटागाडी कधी तरी येत असल्याचे सखाराम पाटील यांचे म्हणणो आहे. तसेच नाल्याची साफसफाईही व्यवस्थित केली जात नाही. परिणामी पाणी जगोजागी तुंबते. पाणी साचल्याने डासांचे प्रामण वाढते, तसेच फवारणीही वेळत होत नसल्याचे कामोठेकरांचे म्हणणो आहे.
वसाहतीत गेल्या पंधरवडय़ात डेंग्यूचे दहा रुग्ण आढळले आहेत, त्याचबरोबर मलेरियाच्या रुग्ण वाढत होत आहे. याबाबत हिवताप निर्मुलन, सिडकोचे आरोग्य व इंजिनिअरिंग विभागाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कामोठेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (वार्ताहर)
आम्ही सिडको वसाहतीत प्रत्येक सेक्टरमध्ये स्वच्छता मोहीम राबवत आहोत. जर डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळला तर त्या ठिकाणी विशेष लक्ष पुरविण्यात येत आहे. त्याचबरोबर वसाहतींमध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे.
- डॉ. बी. एस. बावस्कर, मुख्य आरोग्य अधिकारी सिडको