शहरात डेंग्यूचे रुग्ण पुन्हा वाढले

By Admin | Updated: October 8, 2014 02:16 IST2014-10-08T02:16:41+5:302014-10-08T02:16:41+5:30

बदलते वातावरण सध्या मुंबईकरांसाठी ‘ताप’दायक ठरत आहे. यंदाच्या पावसाळ््यात आटोक्यात असलेल्या डेंग्यूने सप्टेंबरपासून डोके वर काढले आहे

Dengue cases have increased again in the city | शहरात डेंग्यूचे रुग्ण पुन्हा वाढले

शहरात डेंग्यूचे रुग्ण पुन्हा वाढले

मुंबई : बदलते वातावरण सध्या मुंबईकरांसाठी ‘ताप’दायक ठरत आहे. यंदाच्या पावसाळ््यात आटोक्यात असलेल्या डेंग्यूने सप्टेंबरपासून डोके वर काढले आहे. तापाच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.
आॅगस्टमध्ये डेंग्यूचे ६५ रुग्ण आढळले होते. मात्र सप्टेंबर महिन्यात हीच संख्या ११७ वर पोहचली. आॅक्टोबरमध्येही खासगी दवाखान्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळू लागले आहेत. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये मुंबईतील तापाचे रुग्ण वाढल्याचे दिसते सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तापाचे एकूण २ हजार ७०५, तर डेंग्यूचे ४९ रुग्ण आढळले होते. हवामानात होणाऱ्या बदलांमुळे मुंबईकर आजारी पडत आहेत. सप्टेंबरच्या शेवटी अचानक सुरू झालेला उकाडा आणि मध्येच आलेला पाऊस, हे वातावरण डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक असते. त्यामुळेच डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे, असे डॉ. वरदा वाटवे यांनी सांगितले.
डेंग्यूच्या तापाबरोबरच पोटदुखी, घशाला संसर्ग, ताप असे त्रासही वाढले आहेत. आॅक्टोबर हीट सुरू झाल्यामुळे मुंबईकरांना जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Dengue cases have increased again in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.