मेट्रो दरवाढीविरुद्ध घाटकोपरमध्ये निदर्शने
By Admin | Updated: August 11, 2015 02:14 IST2015-08-11T02:14:31+5:302015-08-11T02:14:31+5:30
मेट्रोची दरवाढ करण्यास सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे मेट्रोचे भाडे ४० रुपयांवरून ११० रुपये होणार आहे. या दरवाढीचा विरोध करण्यासाठी सोमवारी शिवसेना

मेट्रो दरवाढीविरुद्ध घाटकोपरमध्ये निदर्शने
मुंबई : मेट्रोची दरवाढ करण्यास सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे मेट्रोचे भाडे ४० रुपयांवरून ११० रुपये होणार आहे. या दरवाढीचा विरोध करण्यासाठी सोमवारी शिवसेना कार्यकर्त्यांनी घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर जोरदार निदर्शने केली.
सध्या मेट्रोचे किमान तिकीट १० रुपये आणि कमाल तिकीट ४० रुपये आहे. रिलायन्सने पुन्हा तिकीट दरवाढीचा प्रयत्न केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दरनिश्चिती समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार केंद्राने मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ई. पद्मनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने मुंबई मेट्रो वन प्रा. लि.कडे (एमएमओपीएल) अहवाल सादर केला. नोव्हेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत. ही संभाव्य दरवाढ रद्द करावी, या मागणीसाठी घाटकोपरमधील शिवसैनिकांनी मेट्रो स्थानकाबाहेर निदर्शने केली. (प्रतिनिधी)