मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालया समोर शेकडो त्रस्त फ्लॅट खरेदीदार धारकांची निदर्शने
By मनोहर कुंभेजकर | Updated: March 4, 2023 18:27 IST2023-03-04T18:26:46+5:302023-03-04T18:27:19+5:30
विविध रिअल इस्टेट प्रकल्पांच्या शेकडो त्रस्त फ्लॅट खरेदीदार धारकांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने केली.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालया समोर शेकडो त्रस्त फ्लॅट खरेदीदार धारकांची निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई- आज सकाळी वॉचडॉग फाऊंडेशनच्या सदस्यांसह विविध रिअल इस्टेट प्रकल्पांच्या शेकडो त्रस्त फ्लॅट खरेदीदार धारकांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने केली. यावेळी फ्लॅट खरेदीदारांच्या शिष्टमंडळाच्या वतीने वॉचडॉग फाऊंडेशनचे विश्वस्त अॅड. गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस आल्मेडा तसेच बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशनचे अॅड. विवियन डिसूझा,रिटा डिसा, सिंथिया गोन्साल्विस, अॅड. ट्यूलिप ब्रायन मिरांडा आणि इतर १०० त्रस्त फ्लॅट खरेदीदार धारकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी डॉ. विकास नाईक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सुपूर्द केले.
रिअल इस्टेट प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी महारेरा वर अधिक सदस्यांच्या नियुक्तीला होणारा विलंब टाळा, तक्रार दाखल केल्यापासून ६० दिवसांच्या आत रेरा प्रकरणे निकाली काढण्यास होणारा विलंब टाळा,तीन वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या एसआरए योजना प्रकल्पांसाठी लेटर ऑफ इंटेंटची समाप्ती आणि त्यांच्या जागी नवीन विकासकांची नियुक्ती करा,रखडलेल्या रिअल इस्टेट प्रकल्पाला एसडब्ल्यूएएमआयएच निधी देण्यात यावा, रखडलेल्या प्रकल्पांचे तपशीलवार फॉरेन्सिक ऑडिट करा, या विविध मागण्यांसाठी सदर आंदोलन छेडण्यात आल्याची माहिती अँड.ग्रोडफे पिंमेटा यांनी दिली. याची अंमलबजावणी केल्यास मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी उपरोक्त उपक्रम घर खरेदीदारांचे तसेच बिल्डर्स लॉबीच्या त्रासाला दूर करण्यासाठी खूप मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"