लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : प्रभादेवी येथील महत्त्वाच्या रोड ओव्हरब्रिजच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेग आला असून, पुलाच्या पश्चिम रेल्वे हद्दीतील पाडकामाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. रेल्वेने शनिवारी मध्यरात्री घेतलेल्या ब्लॉकदरम्यान २७ हजार किलो वजनाचे दोन गर्डर सुरक्षितरीत्या ‘डी-लाँच’ करण्यात आले.
या कामानंतर आता पुलाच्या मध्य रेल्वे भागातील पाडकाम हा पुढील टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे. प्रभादेवी येथील रोड ओव्हरब्रिज वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जुन्या संरचनेच्या पाडकामानंतर नव्या, अधिक सुरक्षित आणि आधुनिक पुलाच्या उभारणीला गती मिळणार आहे.
गर्डर डी-लाँचिंगसारख्या जटिल कामासाठी पश्चिम रेल्वेकडून शनिवारी रात्री १२:३० ते सकाळी ६ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. या कालावधीत चर्चगेट ते दादर दरम्यानची उपनगरी लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती.
अवजड गर्डर हटवण्याची जटिल प्रक्रिया; तज्ज्ञ कर्मचारी तैनात
या कामामध्ये ३२ मीटर लांबीचे आणि सुमारे २७ हजार किलो वजनाचे दोन गर्डर ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनच्या साहाय्याने सावधगिरीने खाली उतरवण्यात आले. रेल्वे ट्रॅकवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी प्रत्येक टप्प्यावर तज्ज्ञ अभियंते आणि सुरक्षा कर्मचारी तैनात होते. ओव्हरहेड वायर हटवून ती पुन्हा सक्रिय करणे ही कामे अत्यंत मर्यादित वेळेत हे काम पूर्ण करणे हे मोठे आव्हान होते.
Web Summary : The western railway section demolition of Prabhadevi bridge is now complete. During a block, two girders were safely de-launched. The next phase focuses on demolishing the central railway section. This work paves the way for a safer, modern bridge.
Web Summary : प्रभादेवी पुल के पश्चिमी रेलवे खंड का विध्वंस पूरा हुआ। ब्लॉक के दौरान, दो गर्डर सुरक्षित रूप से हटाए गए। अगला चरण मध्य रेलवे खंड को ध्वस्त करना है। यह कार्य एक सुरक्षित, आधुनिक पुल का मार्ग प्रशस्त करता है।