पोलिसांच्या वेशात पैशांची मागणी; बहुरूपी म्हणून फिरायचा
By गौरी टेंबकर | Updated: October 17, 2023 18:34 IST2023-10-17T18:34:09+5:302023-10-17T18:34:23+5:30
गोरेगावच्या गोगटेवाडी परिसरात दोन ते तीन इसमाना स्थानिकांनी पकडुन वनराई पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांच्या वेशात पैशांची मागणी; बहुरूपी म्हणून फिरायचा
मुंबई : गोरेगावच्या गोगटेवाडी परिसरात दोन ते तीन इसमाना स्थानिकांनी पकडुन वनराई पोलिसांच्या ताब्यात दिले. ते मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास हुबेहूब पोलिसांच्या गणवेशाप्रमाणे दिसणारे कपडे घालून सदर परिसरातील ऑफिसात फिरत होते.
याबाबत काही लोकांना संशय आल्यानंतर त्यांच्याकडे विचारणा केल्यावर ते बहुरूपी असल्याचे त्यांनी लोकांना सांगितले. वनराईत काही कार्यक्रम आयोजित करायचा असल्याचे सांगत पैशाची मागणी झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्यानुसार या प्रकरणी तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामप्यारे राजभर यांनी सांगितले.