Join us  

गणेशोत्सव काळात शालेय विद्यार्थ्यांच्या कोणत्याही स्वरूपाच्या परीक्षा घेवू नये, युवासेनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 8:07 PM

महाराष्ट्र राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. विशेषता: कोकणातील बहूतांश चाकरमानी आपल्या कुटुंबियांसमवेत घरी (गावी) जातात.

मुंबई - महाराष्ट्र राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. विशेषता: कोकणातील बहूतांश चाकरमानी आपल्या कुटुंबियांसमवेत घरी (गावी) जातात. परिणामी अनेक शालेय विद्यार्थी शाळेमध्ये जात नाहीत. अनेक सरकारी शाळांना गौरी गणपती विसर्जनपर्यंत सुट्टी दिली जाते. परंतु काही कॉन्वेंट शाळा सुट्टी तर नाहीच परंतु हेतुपरस्पर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतात.

या कॉन्वेंट शाळाचालकांना शाळेला सुट्टी देण्याचे तसेच पूर्ण गणेशोत्सव कालावधीत परीक्षा घेण्यास मज्जाव् करण्याचे निर्देश द्यावे यासाठी असंख्य पालकांच्या तक्रारी युवासेनाप्रमुख व शिबसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे आल्या होत्या.

या अनुषंगाने  आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना विधीमंडळ मुख्यप्रतोद,आमदार  सुनील प्रभु आणि युवासेना मुंबई विद्यापीठ सीनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, महादेव जगताप, राजन कोलंबेकर यांनी आज दुपार शालेय शिक्षणमंत्री  आशिष शेलार यांची भेट घेवून गणेशोत्सव काळात कोणत्याही परीक्षा घेवू नये अशी आग्रही मागणी केली होती.तात्काळ  आशिष शेलार यांनी बैठकीत उपस्थित असलेले शिक्षण विभागाचे उपसंचालक  आयरे यांना गणेशोत्सव काळात शाळांना पाच दिवसांची सुट्टी देवून संपूर्ण गणेशोत्सव काळात लेखी व तोंडी कोणत्याही परीक्षा घेवू नये असे परिपत्रक काढन्याचे निर्देश दिले.

टॅग्स :शिक्षण क्षेत्रमहाराष्ट्र