Join us  

गर्भवती महिलेला लोकल डब्यात दोन जागा राखीव ठेवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 2:03 AM

महाराष्ट्र महिला आयोग : रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना निवेदन

मुंबई : गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातेला प्रत्येक लोकलच्या डब्यात दोन जागा राखीव ठेवण्याची मागणी महाराष्ट्र महिला आयोग यांच्याकडून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे करण्यात आली आहे. लोकलमधून महिलांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यात गर्भवती आणि स्तनपान करणाºया महिलांना प्रवास करणे कठीण होते. त्यामुळे अशा महिलांना प्रत्येक सामान्य डब्यांमध्ये दोन जागा राखीव ठेवण्याची मागणी केली आहे. सकाळ आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. यातून प्रवास करणे गैरसोयीचे असते. गर्भवती आणि स्तनपान करणाºया महिलांना आपला प्रवास सुरक्षित आणि सुलभ होण्यासाठी दोन जागा राखीव ठेवण्यात याव्यात, अशी मागणी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पत्रव्यवहार करून करण्यात आली आहे.

उपनगरीय लोकल मार्गाहून तब्बल ६० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यात महिल्यांचे प्रमाण ३० ते ४० टक्के आहे. मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरून सकाळी आणि सायंकाळी प्रचंड प्रमाणात गर्दी असते. महिला डब्यांत प्रचंड गर्दी असल्याने गर्भवतीमहिला आणि स्तनपान करणाºया महिलांना प्रवास करणे कठीण होते. अशातच स्तनपान करणाºया महिलेला बाळाला दूध पाजण्यासाठी लोकल प्रवासात जागा अनेक वेळा मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्र महिला आयोग यांच्याकडून प्रत्येक सामान्य डब्यात दोन जागा राखीव ठेवण्याची मागणी केली आहे.

स्तनपान करणाऱ्या महिला प्रवाशाला हव्या सुविधापश्चिम रेल्वे प्रशासन महिला लोकल डब्यावर आधुनिक महिलेची प्रतिमा लावते. यात महिला सूटकोटमध्ये आहे. कॉर्पोरेट विभागात काम करणारी ही महिला दिसून येते. मात्र, महिला गर्दीच्या आणि अनेक समस्यांना सामोरे जाऊन प्रवास करतात. यावर प्रशासनाने पावले ठोस उचलणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने गर्भवती महिला आणि स्तनपान करणाºया मातेला विशेष सुविधा पुरवायल्या हव्यात.

टॅग्स :रेल्वेपीयुष गोयल