सॅटीसखाली पोलीस चौकी पुन्हा सुरु करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:39 PM2020-10-17T12:39:49+5:302020-10-17T12:40:39+5:30

ठाणे स्टेशन परिसरात महापालिकेच्या महिला अधिकाºयाशी गैरवर्तन करणाºया रिक्षा चालकाच्या श्रीमुखात लगावल्यानंतर आता येथून गायब झालेली पोलीस चौकी पुन्हा सुरु करण्याची मागणी ठाणेकर नागरीकांनी पालिकेकडे केली आहे.

Demand for reopening of police outpost under Satis | सॅटीसखाली पोलीस चौकी पुन्हा सुरु करण्याची मागणी

सॅटीसखाली पोलीस चौकी पुन्हा सुरु करण्याची मागणी

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची ठाणे स्थानक परिसरात अँटीजन टेस्ट करण्यात येत असून या कामात अडथळा आणणाºया तसेच पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाºया मुजोर रिक्षाचालकांचा माज नौपाडा प्रभाग समितीेच्या सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी उतरवला आहे. त्यानंतर आता येथे यापूर्वी असलेली पोलीस चौकी पुन्हा सुरु करण्यात यावी अशी मागणी नागरीकांनी आता लावून धरली आहे.
                           गुरु वारी काही रिक्षाचालक कामात अडथळा आणत असल्याच्या तक्र ारी प्रणाली घोंगे यांच्याकडे आल्यानंतर त्या जाब विचारण्यातही थेट ठाणे स्थानक परिसरात गेल्या. मात्र घोंगे यांना देखील रिक्षाचकांकडून अरेरावीची भाषा करण्यात आल्यानंतर संतापलेल्या घोंगे यांनी थेट अरेरावी करणाºया एका रिक्षाचालकाच्या श्रीमुखात लावली. त्यांनतर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून हा वाद मिटवला असला तरी अशाच प्रकारे जर रिक्षाचालकांची अरेरावी सुरु राहिली तर गुन्हा ठाणे महापालिकेच्या वतीने गुन्हा दखल करण्यात येईल असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
           दरम्यान या घटनेनंतर सॅटीसखाली असलेली पोलीस चौकी पुन्हा सुरु करण्याची मागणी पुढे आली आहे. यापूर्वी सॅटिसखाली नौपाडा पोलिसांची एक चौकी होती. तोपर्यंत बेशिस्त रिक्षाचालकांवर चांगलाच वचक होता. परंतु ठाणे महापालिकेने या भागातील गर्दी टाळण्यासाठी स्टेशन परिसर सुटसुटीत राहावा या उद्देशाने येथील चौकी हटविली होती. ही चौकी होती, त्यावेळेस रिक्षा चालकांवर लगाम लावण्यात आला होता. परंतु आता अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे, थेट रेल्वे स्थानकापर्यंत जाऊन प्रवाशांना जवळपास खेचत आणणे असले प्रकार येथे सर्रास पहायला मिळत आहेत. याबाबत अनेकदा तक्र ार करूनदेखील काहीही कारवाई न झाल्याने रिक्षाचालकांची मजल सहआयुक्तांशी पंगा घेण्यापर्यंत पोहोचली आहे. हे मुजोर रिक्षाचालक जर वरिष्ठ अधिकाºयांशी असे वर्तन करत असतील तर सामान्य गोरगरिबांना दहशत माजवून कसे लुटत असतील याचा विचार करणे आवश्यक झाले आहे. या रिक्षा आणि टॅक्सीचालकांवर जरब बसावी म्हणून सॅटिसखाली एक पोलीस चौकी स्थापन करण्याची जनतेची मागणी लवकर पूर्ण व्हावी, असे अनेकांनी बोलून दाखिवले. त्यामुळे आता येथे पुन्हा पोलीस चौकी सुरु होणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
 

Web Title: Demand for reopening of police outpost under Satis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.