Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडक्शन कुकटॉप्स’च्या मागणीत तिपटीने वाढ; विशिष्ट भांड्यांची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 15:01 IST

पश्चिम आशियाई देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर विपरीत परिणाम होत आहे. या कारणास्तव घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या वापरावर आणि त्याच्या पुरवठ्यावर काही निर्बंध आले आहेत. 

मुंबई : गॅस सिलिंडरच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे गैरसोय होऊ नये, यासाठी अनेकजण इंडक्शन कुकटॉप्सची (इलेक्ट्रिक शेगडी) खरेदी करताना दिसत आहेत. सरासरी दैनंदिन विक्रीच्या तुलनेत त्याची मागणी जवळपास तिपटीने वाढली आहे. अनेक दुकानांमध्ये ग्राहक एकावेळी अनेक युनिट्स खरेदी करत असल्याचेही दिसून येत आहे.

पश्चिम आशियाई देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर विपरीत परिणाम होत आहे. या कारणास्तव घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या वापरावर आणि त्याच्या पुरवठ्यावर काही निर्बंध आले आहेत. 

घरगुती गॅस सिलिंडर संपल्यानंतर दुसऱ्या सिलिंडरच्या बुकिंगसाठी ग्राहकांना २५ दिवसानंतर बुकिंग करता येत आहे.  परंतु, एकच गॅस सिलिंडर असलेल्या ग्राहकांना मात्र दुसरा पर्याय शोधावा लागत आहे. परिणामी, ग्राहकांचा बाजारपेठेत इलेक्ट्रिक शेगडी घेण्यावर भर वाढला असून, काही ठिकाणी या शेगडीसाठी खासगी दुकानांमध्ये प्रतीक्षा यादी पाहायला मिळत आहे. 

इलेक्ट्रिक केटल्सला वाढती पसंती इंडक्शन कुकटॉप्ससोबतच इलेक्ट्रिक केटल्सची मागणी जवळपास दुप्पटीने वाढली आहे. स्वयंपाकासाठी सोयीस्कर पर्याय म्हणून त्यांची खरेदी होत आहे. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सर्व स्टोअर्स आणि ऑनलाइन साइट्सवर पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याची काळजी घेत असल्याचे एका खासगी रिटेल कंपनीकडून सांगण्यात आले.

विशिष्ट भांड्यांची खरेदी -पूर्व उपनगरात काही शोरूममध्ये इलेक्ट्रिक शेगडी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना बुकिंगसाठी २५० वेटिंग असल्याचे शोरूमकडून ग्राहकांना सांगण्यात आले. या शेगड्यांची वाढती मागणी आणि त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने त्यांची किंमतही वाढू शकते, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. इलेक्ट्रिक शेगडीवर स्वयंपाक बनविण्यासाठी लागणाऱ्या भांड्यांची  खरेदीही करावी लागणार असून, त्याची झळ ग्राहकांना बसणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Induction Cooktop Demand Triples Amid Gas Cylinder Supply Issues

Web Summary : Gas shortages drive induction cooktop sales threefold. Customers buy multiple units, facing waiting lists. Electric kettles also see doubled demand. Special cookware purchase adds to consumer burden.
टॅग्स :मुंबई