Join us

बोरिवली - चर्चगेट या महिला स्पेशल ट्रेन सुरू करा

By मनोहर कुंभेजकर | Updated: July 5, 2024 16:47 IST

बोरिवली - चर्चगेट या महिला स्पेशल ट्रेन सुरू करा, या मागणीसाठी बोरिवली स्टेशनमध्ये सह्यांची मोहिम राबवण्यात आली.

मुंबई - विरार वरून येणाऱ्या ट्रेन मधे बोरीवलीकर महिलांना चढणे मुश्किल असते. त्यामुळे बोरिवली - चर्चगेट या महिला स्पेशल ट्रेन सुरू करा, या मागणीसाठी बोरिवली स्टेशनमध्ये सह्यांची मोहिम राबवण्यात आली.

स्थानिक आमदार सुनील राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप महिला मोर्चा तर्फे बोरिवली स्टेशनवर पश्चिमेला सकाळी ८ वाजल्यापासून सह्यांची विशेष मोहिम राबविण्यात आली. जवळपास १००० महिलांनी बोरिवली - चर्चगेट या महिला स्पेशल ट्रेन सुरू करा या मागणीसाठी सह्या दिल्या.

या संदर्भात स्थानिक खासदार व केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची लवकर भेट घेवून सदर सह्यांचे निवेदन त्यांना देण्यात येणार असल्याचे भाजप बोरिवली विधानसभा महिला मोर्चा अध्यक्ष रेश्मा निवळे यांनी सांगितले.

यावेळी माजी नगरसेवक प्रविण शहा, माजी नगरसेविका आसावरी पाटील, मंडळ अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, रेश्मा निवळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :मुंबईमुंबई लोकलभाजपा