इकोफ्रेन्डली बाप्पांना अमेरिकेतून मागणी

By Admin | Updated: August 17, 2014 23:55 IST2014-08-17T23:10:37+5:302014-08-17T23:55:35+5:30

इकोफ्रेन्डली बाप्पांना अमेरिकेतून मागणी,कुर्ल्याच्या महिला बचत गटाची सातासमुद्रापार झेप.

Demand from eco-friendly babies in the United States | इकोफ्रेन्डली बाप्पांना अमेरिकेतून मागणी

इकोफ्रेन्डली बाप्पांना अमेरिकेतून मागणी

समीर कर्णुक / मुंबई
गेल्या काही वर्षांपासून गणपतींच्या मूर्तीसाठी पीओपीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शहरात प्रदूषण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. ही बाब लक्षात घेऊन कुर्ल्यातील एका महिला बचत गटाने कागदापासून गणपतीच्या मूर्ती तयार केल्या आहेत. या मूर्ती प्रदूषणमुक्त असल्याने अमेरिकेमध्ये देखील या गणपती मुर्त्यांना मागणी वाढली असून यावर्षी तब्बल पाचशे बाप्पा अमेरिकेला जाणार आहेत.
गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण. पूर्वी १५ ते २० घरामध्ये एकच गणपती असायचा. सध्या मात्र प्रत्येक घरामध्ये गणेश उत्सव साजरा केला जातो. गणेशमूर्ती बनवण्यासाठी पीओपीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने या मूर्ती पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे पाणी दूषित होऊन प्रदूषण वाढण्याचा धोका निर्माण होतो. गेल्या काही वर्षात मुंबईमध्ये प्रदूषण वाढल्याने याला आळा घालण्यासाठी कुर्ल्याच्या कामगार नगर येथे राहणारे संदीप गजाकोश यांनी इकोफें्रडली ही संकल्पना समोर आणली. या मूर्ती बनवताना केवळ वर्तमानपत्राचा लगदा, डिंक आणि व्हाईटनरच्या माध्यमातून ५० मूर्ती तयार केल्या. वजनाने अगदीच हलक्या शिवाय हुबेहुब पीओपी सारखी क्वॉलीटी असल्याने पहिल्याच वर्षी या बाप्पाच्या मुर्त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला.
मुंबई महानगर पालिकेत कामाला असलेले गजाकोश यांच्याकडे पुरेसा वेळ आणि मनुष्यबळ देखील नव्हते. त्यामुळे त्यांनी परिसरात असलेल्या भाग्यलक्ष्मी महिला बचत गटाशी संपर्क साधला. या महिलांना काहीतरी रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी गजाकोश यांनी या महिलांना काही महिने गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानुसार गेल्या वर्षी या महिलांनी एक हजार गणेश मूर्ती बनवल्या. मात्र काही महिलांना घरची सगळी काम सांभाळून हे काम शक्य होत नसल्याने काही महिलांच्या घरी कच्चा माल दिला. त्यानुसार महिला सर्व जबाबदार्‍या सांभाळून हे काम देखील करत आहेत. दिवसभरात त्यांना दोनशे रुपये मिळत असल्याने सध्या या बचत गटातील महिलांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
संदीप गजाकोश यांच्याकडे चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत गणपती बनवण्यासाठी येतात. तसेच त्यांनी बनवलेल्या गणपतींचे अनेक ठिकाणी प्रदर्शन देखील भरण्यात आले आहे. येत्या काही वर्षात संपूर्ण शहरात इकोफे्रंडली गणेशमूर्ती बनवण्याचा त्यांचा मानस आहे.

स्वस्त आणि हलक्या
संपूर्ण मूर्ती ही कागदाच्या लगद्यापासून तयार होत असल्याने पीओपी मूर्तीपेक्षा ती अगदीच हलकी असते. शिवाय यामध्ये वापरण्यात येणारे रंग देखील नैसर्गिक असल्याने मूर्तीचे पाण्यात विसर्जन झाल्यानंतर पाण्यात असणार्‍या जीवांना याचा काहीही धोका संभवत नाही. पीओपी महाग असल्याने त्यापासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती देखील महाग विकल्या जातात. मात्र, इकोफे्रंडली मूर्ती त्यापेक्षा ३० ते ४० टक्यांनी स्वस्त मिळते. परदेशात राहणार्‍या भारतीयांना इकोफ्रंेडली गणेशमूर्ती मिळवण्यासाठी गजाकोश यांनी ीूङ्मॅंल्ली२ँं.्रल्ल वेबसाईट देखील तयार केली आहे.

 

Web Title: Demand from eco-friendly babies in the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.