रोजगारासाठी वनराई बंधारे बांधण्याची मागणी
By Admin | Updated: October 27, 2014 00:54 IST2014-10-27T00:54:34+5:302014-10-27T00:54:34+5:30
तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला, मोगरा, भात, हरभरा, चवळी यांची लागवड करण्यास सुरूवात झाली असून, काही आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी नदी, नाल्या, ओढ्यालगत आहेत

रोजगारासाठी वनराई बंधारे बांधण्याची मागणी
विक्रमगड : तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला, मोगरा, भात, हरभरा, चवळी यांची लागवड करण्यास सुरूवात झाली असून, काही आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी नदी, नाल्या, ओढ्यालगत आहेत. त्यामुळे पाण्याचा स्रोत असल्याने येथे रोजगार हमीच्या माध्यमातून वनराई बंधारे होऊ शकतात. या बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना फायदा मिळू शकतो.
तालुक्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा वनराई बंधाऱ्याच्या फायदा शेतकरी घेत होते.
मात्र, गेल्या वर्षीपासून वनराई बंधाऱ्यांच्या प्रमाणात फारच घट झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आले. या वनराई बंधाऱ्यामुळे
मजुरांना रोजगार मिळत होता
व शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होत होते.
परंतु पंचायत समितीचा आडमुठी धोरणामुळे तालुक्यात बंधारे बांधणेच बंद झाले. या बंधाऱ्यामुळे पाण्याचा साठा वाढला. दरवर्षी काही भागात आटणारे पाणी एक ते दीड महिना उशिराने आटू लागते. पाण्याची पातळी वाढल्याने हे वनराई बंधारे होणे गरजेचे आहे. (वार्ताहर)