Join us  

खराब हवामानामुळे मासेमारी ठप्प, राज्यातील मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 8:05 PM

खराब हवामानामुळे गेली 90 दिवस राज्यातील मासेमारी झाली ठप्प झाली असून शेतक्यांप्रमाणे आता राज्यातील मच्छीमारांना देखिल नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई - खराब हवामानामुळे गेली 90 दिवस राज्यातील मासेमारी झाली ठप्प झाली असून शेतक्यांप्रमाणे आता राज्यातील मच्छीमारांना देखिल नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

गेल्या आठवड्यात चक्रीवादळ ‘क्यार’ मुळेराज्यातील मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.चक्रीवादळाचा प्रभाव जास्त असलेल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे व पालघर  जिल्ह्यातील काही मासेमारी नौका पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. तर काही नौका किरकोळ नुकसान झाले आहे. व नौकांच्या पूर्णत्ता जाळ्यात गेल्या आहेत.

आता बुलबुल (महा)वादळामुळे मासेमारीवर सावट आले असून मासेमारीसाठी गेलेल्या बोटी आज माघारी परतल्या आहेत.मासेमारीचा नव्या मोसमाला गेल्या 1 ऑगस्ट पासून सुरवात झाली होती,मात्र गेली 3 महिने पडत असलेला अवकाळी पाऊस,वादळ यामुळे राज्यातील 720 किमी सागरी किनारपट्टीवरील मासेमारी ठप्प झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी  राजकीय पक्ष व शेतकऱ्यांप्रमाणे राज्यातील मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. गेले 90 दिवस राज्यातील मासेमारी ठप्प झाली आहे.त्यामुळे राज्यातील मच्छीमारांना नुकसानीची पाहणी करून त्यांना राज्य सरकारने रू.100 कोटी व केंद्र सरकारने रू. 100 कोटी आर्थिक नुकसान भरपाई द्यावी आणि शून्य व्याजाने कर्ज उपलब्ध करून घ्यावे. तसेच थकीत डिझेल परतावा तात्काळ मिळावा. अशी आग्रही मागणी महाराष्ट मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. लवकरच त्यांची महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या ऑक्टोबरमध्ये समुद्रावरील उग्र हवामान आणि चक्री वादळामुळे मासेमारी ठप्प झाली.एका मासेमारी ट्रिप साठी सुमारे 2 ते 3 लाख खर्च येतो,मात्र खराब हवामुळे मासे मिळाले नाही.खोलवर मासेमारीसाठी गेलेल्या अनेक मच्छीमारांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते अशी माहिती किरण कोळी यांनी शेवटी दिली.

टॅग्स :मच्छीमारमुंबईमहाराष्ट्र