नारळपाण्याची मागणी वाढली
By Admin | Updated: March 15, 2015 22:25 IST2015-03-15T22:25:02+5:302015-03-15T22:25:02+5:30
देवाची करणी आणि नारळात पाणी अशी म्हण सर्वप्रचलित अशीच आहे. नारळाचे हे पाणीच उन्हाळ्यात क्षुधा शांत करते. शहाळ्यातील मधुर पाण्याला

नारळपाण्याची मागणी वाढली
पनवेल : देवाची करणी आणि नारळात पाणी अशी म्हण सर्वप्रचलित अशीच आहे. नारळाचे हे पाणीच उन्हाळ्यात क्षुधा शांत करते. शहाळ्यातील मधुर पाण्याला तशी वर्षभर मागणी असते. पण उन्हाळ्यामुळे मागणी दुपटी-तिपटीने वाढली आहे. पनवेल आणि सिडको वसाहतीत मोठ्या प्रमाणात नारळपाण्याची विक्री होताना सध्या दिसत आहे.
कोल्ड्रिंक्स, आइस्क्रीमच्या जमान्यातही नारळपाणी आपले सत्त्व टिकवून आहे. उन्हाने कासावीस झाल्यानंतर शीतपेयांनी तात्पुरता थंडावा मिळतो. बर्फ घातलेले लिंबूसरबत किंवा फळांच्या रसाचाही प्रभाव काही काळच राहतो, मात्र कोणत्याही पदार्थाची जोड न देता मिळणारे शंभर टक्के निर्मळ आणि निर्भेळ असे पेय म्हणजे नारळपाणी. समोर हिरवेगार सोसलेल्या शहाळ्यातील काठोकाठ भरलेल्या मधुर पाण्याचा आस्वाद शहरवासीय सध्या घेताना दिसत आहेत.
नारळपाणी केवळ तहान भागवत नाही, तर उन्हाळ्याने डीहायड्रेड झालेल्या शरीरात नवी तरतरी भरते. त्यामुळे शीतपेय, सरबताच्या भाऊगर्दीत हे निर्मळ पेय आपली शान टिकवून आहे. दोन शहाळ्यांचे पाणी आणि त्यातील कोवळे खोबरे खाल्ल्यास एका सलाइनचा प्रभाव शरीरावर जाणवतो.
रु ग्णालयाच्या परिसरातील फ्रुट स्टॉलवर किंवा हातगाडीवर शहाळी हमखास मिळतात. ठिकठिकाणी असलेल्या फळांच्या दुकानात किंवा चौकात लागणाऱ्या हातगाड्यांवरही ते उपलब्ध होतात. (प्रतिनिधी)