रस्त्यालगत औषधे टाकणाऱ्या विक्रेत्यावर कारवाईची मागणी

By Admin | Updated: June 19, 2014 00:05 IST2014-06-19T00:05:19+5:302014-06-19T00:05:19+5:30

पनवेल शहरातील द्वारका हॉटेलसमोरील रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात औषधे टाकली जात असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

Demand for action on the drug peddlers on the road | रस्त्यालगत औषधे टाकणाऱ्या विक्रेत्यावर कारवाईची मागणी

रस्त्यालगत औषधे टाकणाऱ्या विक्रेत्यावर कारवाईची मागणी

पनवेल : पनवेल शहरातील द्वारका हॉटेलसमोरील रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात औषधे टाकली जात असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एका अज्ञात विक्रेत्याने गोळ्या, सिरप, गुडनाईट, मॅट, कॉईल, मलम अशी विविध प्रकारची औषधे टाकली आहेत. यापूर्वीही रस्त्यावर आॅपरेशनसाठी वापरलेल्या सुई, ब्लेड रस्त्यावर टाकलेल्या आढळल्या होत्या. ही औषधे खराब असतील आणि ती जर एखाद्या लहान मुलाच्या हातात लागून त्याचा वापर केला गेला तर जीवितहानी होऊ शकते, अशी औषधे रस्त्यावर टाकणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Demand for action on the drug peddlers on the road