हार्बरवर १९ एसी लोकलची मागणी
By Admin | Updated: March 31, 2016 01:57 IST2016-03-31T01:57:50+5:302016-03-31T01:57:50+5:30
लोकल झटपट मिळण्यासाठी कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टीम (सीबीटीसी) सारखी नवी सिग्नल यंत्रणा प्रथम सीएसटी ते हार्बर

हार्बरवर १९ एसी लोकलची मागणी
मुंबई : लोकल झटपट मिळण्यासाठी कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल
सिस्टीम (सीबीटीसी) सारखी नवी सिग्नल यंत्रणा प्रथम सीएसटी ते हार्बर मार्गावर बसविण्याचा
निर्णय घेतला आहे. ही यंत्रणा पूर्ण केल्यावर त्या यंत्रणेवर लोकल धावण्यासाठी एसी लोकलची गरज आहे. त्यामुळे जवळपास बारा डब्यांच्या १९ वातानुकूलित लोकलची मागणी मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे केली आहे.
सीबीटीसीसारख्या यंत्रणेमुळे ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ होण्यास आणि क्षमता वाढण्यास मदत मिळणार आहे. एमआरव्हीसीकडून मध्य रेल्वेची मेन लाइन असलेल्या सीएसटी ते कल्याण आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार धिम्या मार्गावर ही यंत्रणा बसविली जाणार आहे. मात्र ही यंत्रणा प्रथम हार्बर मार्गावरील सीएसटी ते पनवेल दरम्यान बसविण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आहे. याबाबतचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. यासाठी मध्य रेल्वेने बारा डब्यांच्या १९ एसी लोकलची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)