बेहिशोबी रोकड बाळगणार्यांची जामीनावर सुटका
By Admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:18+5:302014-10-04T22:55:18+5:30
बेहिशोबी रोकड बाळगणार्यांची जामीनावर सुटका

बेहिशोबी रोकड बाळगणार्यांची जामीनावर सुटका
ब हिशोबी रोकड बाळगणार्यांची जामीनावर सुटकामुंबई: भांडुपमध्ये बेहिशेबी २५ लाखांची रोकड बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. आज त्यांंची प्रत्येकी सात हजारांच्या जामीनावर सुटका झाली आहे.भांडुप सोनापुर येथून गोरेगाव येथे गाळा खरेदी करण्याच्या नावाखाली भाजीच्या पिशवीतून या त्रिकुटाने २५ लाखांची बेहिशेबी रोकड बाळगली होती. त्यातही सदर रक्कम ही कुवेत येथून हवाला मार्गे आल्याची कबुली आरोपींनी दिली होती. याप्रकरणी सौकतली मेहबुअली खान (६०), इनामुल हसन सौकत अलीखान (३२) आणि रामप्रसाद यादव (३६) यांना अटक केली होती. पोलीस कोठडीत असलेल्या या आरोपींंची शनिवारी प्रत्येकी सात हजारांच्या जामीनावर सुटका करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे भांडूप पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)