Join us
Daily Top 2Weekly Top 5

धर्मादाय आयुक्त डिगे यांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 05:18 IST

राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांची मुंबई उच्च न्यायालयात निबंधक (रजिस्ट्रार) पदी बदली करण्यात आली आहे.

मुंबई : राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांची मुंबई उच्च न्यायालयात निबंधक (रजिस्ट्रार) पदी बदली करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ लोकाभिमुख निर्णयांमुळे चर्चेत होता. धर्मादाय संस्था, देवस्थानांच्या सहकार्यातून दुष्काळग्रस्त भागातील युवक-युवतींचे सामुदायिक विवाह सोहळे, नाममात्र दरात डायलिसिस सेंटर, तसेच ‘झीरो पेंडन्सी’चे लक्ष्यही गाठले गेले. आयुक्तालयाचा आॅनलाइन कारभार करतानाच २४ तासांत संस्था नोंदणीचा उपक्रमही यशस्वी केला. राज्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या नावात ‘धर्मादाय’ शब्दाचा उल्लेख बंधनकारक करण्याचा निर्णयही डिगे यांनी घेतला.