आरोग्य केंद्राचा बोजवारा
By Admin | Updated: September 19, 2014 23:20 IST2014-09-19T23:20:10+5:302014-09-19T23:20:10+5:30
घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्णवाहिका इ. अभाव आहे.

आरोग्य केंद्राचा बोजवारा
बोर्डी : घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्णवाहिका इ. अभाव आहे. आदिवासी रुग्णांना वैद्यकीय सेवांपासून वंचीत राहावे लागत असल्याने शासनाविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बोर्डी परीसरातील पन्नास हजार लोकसंख्येकरीता अकरा उपकेंद्राची आरोग्य सुविधा घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे केली जाते. यामध्ये नव्वद टक्के आदिवासी आहेत. इंडियन पब्लिक हेल्थ स्टँटर्डनुसार आदिवासी भागात तीस हजार लोकसंख्येकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र तर पाच हजार लोकांकरीता उपकेंद्र आवश्यक आहे. त्यानुसार 2 एम.बी.बी.एस., 1 बी. ए. एम. एस. डॉक्टर, 6 खाटा, रुग्णवाहिकांसह अन्य सुविधा पुरविल्या जातात. मात्र घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वर्षापासुन डॉक्टरांची पद रीक्त आहेत. चिखले उपकेंद्राचे डॉ. बी. सी. खेडकर यांना अतिरिक्त भार सोपवला असल्याचे दोन्हीकडे रुग्णांचे अतोनात हाल होत आहे. चालकाअभावी तीन वर्ष रुग्णवाहिका पडून आहे. आदिवासींना स्वखर्चाने खाजगी वाहतुक सेवेचा आधार घ्यावा लागतो. खेडोपाडय़ात एस.टी सेवेची वाणवा आहे. आरोग्य केंद्राच्या परिसरात पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते. दुरसंचाराची ओएफसी केबल व उपकरण उघडय़ावर टाकण्यात आली आहेत. नजीकच डहाणू-बोर्डी सागरी मार्ग आहे. रस्त्याच्या दुरावस्थेने वाहतुक कोंडी, ध्वनीप्रदुषण इ. प्रश्न गंभीर बनले आहत.शासनाच्या विविध आरोग्य मोहिमा, लसीकरण योजना, स्तनदामाता, गर्भवती महिला, अपंग इ. सेवेचा लाभ मिळत नाही.
4बोर्डी परीसरातील पन्नास हजार लोकसंख्येकरीता अकरा उपकेंद्राची आरोग्य सुविधा घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे केली जाते. यामध्ये नव्वद टक्के आदिवासी आहेत.त्यांचे होत आहेत हाल.
4घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वर्षापासुन डॉक्टरांची पद रीक्त आहेत. चिखले उपकेंद्राचे डॉ. बी. सी. खेडकर यांना अतिरिक्त भार सोपवला असल्याचे दोन्हीकडे रुग्णांचे अतोनात हाल होत आहे. चालकाअभावी तीन वर्ष रुग्णवाहिका पडूनआहे. आदिवासींना स्वखर्चाने खाजगी वाहतुक सेवेचा आधार घ्यावा लागतो.