पहिल्या पावसात देहरंग ओव्हरफ्लो

By Admin | Updated: June 23, 2015 01:11 IST2015-06-23T01:11:46+5:302015-06-23T01:11:46+5:30

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पनवेल नगरपालिकेच्या मालकीचे देहरंग धरण भरले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा धरण लवकर भरले

Dehring Overflow in the first rain | पहिल्या पावसात देहरंग ओव्हरफ्लो

पहिल्या पावसात देहरंग ओव्हरफ्लो

पनवेल : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पनवेल नगरपालिकेच्या मालकीचे देहरंग धरण भरले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा धरण लवकर भरले असून १० दिवसांत पनवेल शहराला पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख आर. आर. तायडे यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात पाण्याकरिता इतर यंत्रणांवर पूर्णपणे अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. धरण भरल्यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
माथेरान डोंगराच्या पायथ्याशी पनवेल पालिकेच्या मालकीची २७७ हेक्टर जमीन असून त्यापैकी १२५ हेक्टरवर देहरंग धरण आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असणारी राज्यातील ही पहिलीच नगरपालिका आहे. या धरणातून पनवेल शहराला पाणीपुरवठा केला जातो. माथेरानच्या डोंगराची माती वाहून आल्याने धरणाची साठवणूक क्षमता कमी झाली आहे. त्याचा परिमाण शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला. या ठिकाणाहून पनवेल शहराला उन्हाळा वगळता इतर वेळी प्रति दिन १२ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाण्याची दुप्पट मागणी आहे. त्याकरिता एमजेपी आणि एमआयडीसीकडून पाणी विकत घेतले जाते.
मार्च, एप्रिलमध्ये धरण कोरडे पडल्यानंतर पालिकेला पाण्याकरिता पूर्णत: या दोन विभागांवर अवलंबून राहावे लागते. त्यासाठी वाढीव कोटा घ्यावा लागतो आणि कोट्यवधी रुपये मोजावे लागतात. गेल्या तीन दिवसांपासून देहरंग परिसरात समाधानकारक पाऊस पडला आणि आज सकाळी धरणाने सांडवा पातळी गाठली. त्यामुळे गोडबोले गेटही उघडण्यात आले असून पाणी गाढी नदीत वाहू लागले आहे. माथेरान आणि हाजी मलंगच्या डोंगरावरून मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आल्याने पाणी गढूळ झाले आहे. परिणामी आठ दिवसांनंतर गाळ निवळला की पनवेल शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

Web Title: Dehring Overflow in the first rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.