पदवी कट आॅफचा पारा वरखाली!
By Admin | Updated: June 17, 2015 03:13 IST2015-06-17T03:13:35+5:302015-06-17T03:13:35+5:30
मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांतील कला, विज्ञान, वाणिज्य आणि विविध विभागांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या

पदवी कट आॅफचा पारा वरखाली!
मुंबई : मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांतील कला, विज्ञान, वाणिज्य आणि विविध विभागांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाची कट आॅफ लिस्ट मंगळवारी जाहीर झाली. नामांकित महाविद्यालयांत कला शाखेसाठी नव्वदी ओलांडलेला कट आॅफचा टक्का काही महाविद्यालयांत मात्र ४० टक्क्यांपर्यंत घसरला. तर वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी मात्र कट आॅफचा पारा ७५ ते ९०%दरम्यान स्थिरावला.
रुईया महाविद्यालयातील कला शाखेतील प्रथम वर्ष प्रवेशासाठी कट आॅफ ९०.९२% होता, तर दुसरीकडे साठ्ये महाविद्यालयात ३८ टक्क्यांपर्यंत उतरला, तर विज्ञान शाखेसाठीची कट आॅफ ८७.५० टक्क्यांवर स्थिरावली असताना रुईया महाविद्यालयात ती ७८.७७पर्यंत घसरली. वाणिज्य शाखेत एनएमच्या पहिल्या कट आॅफचा टक्का ९५.८० टक्क्यांवर पोचला. तर पोदार महाविद्यालयाची कट आॅफ लिस्ट यंदा ९४.२० टक्क्यांवर वाढली.
कलेसाठी रुपारेल, रुईयास पसंती : कला शाखेसाठी विद्यार्थ्यांनी यंदाही रुपारेल आणि रुईया महाविद्यालयाला पसंती दिली. कला शाखेच्या पहिल्या वर्षासाठी रुपारेलची पहिलीच यादी ९३.५३ टक्क्यांवर स्थिरावली.
बीएमएमची वाढती क्रेझ : गेल्या काही वर्षांत मास मीडियाची विद्यार्थ्यांना भुरळ पडल्याचे दिसत आहे. यंदाही बहुतांश महाविद्यालयांतील बीएमएमची पहिली कट आॅफ लिस्ट ८० ते ९० टक्क्यांदरम्यान स्थिरावली. तर बीएफएम व बीबीआयच्या कट आॅफ लिस्टचा आकडा ७० टक्क्यांवरच दिसला.