Join us  

नौदलाची ताकद वाढली; 'आयएनएस खांदेरी' अत्याधुनिक पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 10:32 AM

'पाणीबुडीचा एका तासात कमाल वेग 35 ते 40 किमी आहे.'

मुंबई : भारतीय नौदलाच्या ताफ्यात स्कॉर्पिन श्रेणीतील ‘खांदेरी’ ही अत्याधुनिक पाणबुडी आज दाखल करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या पाणीबुडीचे मुंबईत 'वेस्टर्न नेव्हल कमांड'मध्ये लोकार्पण करण्यात आले असून पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. 

आज आमच्या सरकारच्या मजबूत संकल्पामुळे आयएनएस खांदेरी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे नौदलाची क्षमता वाढली आहे, हे पाकिस्तानला समजले पाहिजे. भारत आता पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यास सक्षम आहे. मुंबईवर 26/11 रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तसाच कट आता पुन्हा रचला जात आहे. तो आता यशस्वी होऊ देणार नाही. कोणीही देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर नौदलाकडून त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. 

तसेच, खांदेरीचे नाव 'स्वॉर्ड टूथ फिश'पासून प्रेरित आहे. जो फिश समुद्राच्या तळापर्यंत पोहोचून शिकार करण्यासाठी ओळखला जाणारा घातक मासा आहे, असेही यावेळी राजनाथ सिंह म्हणाले. 

दरम्यान, खांदेरी स्कॉर्पिन श्रेणीतील ही दुसरी पाणबुडी आहे. यापूर्वी कलवरी ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली होती. या पाणबुडीमध्ये शत्रूवर थेट हल्ला करण्याची क्षमता आहे. ही अत्याधुनिक सुविधांनी युक्त कन्व्हेन्शनल डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी असून, पाण्यात आवाजाच्या तरंगावरून पाणबुडीचा शोध घेतला जातो; मात्र या पाणबुडीचा आवाज येत नसल्याने रडारवर ही पाणबुडी दिसत नाही. या पाणबुडीत शत्रूवर थेट हल्ला करण्याची तसेच कोणत्याही स्थितीत कार्यरत राहण्याची क्षमता आहे. या पाणबुडीचा वेग प्रति तास 20 नॉटिकल मैल आहे. 

पाणीबुडीचा एका तासात कमाल वेग 35 ते 40 किमी आहे. ती सलग 45 दिवस पाण्यात राहू शकते. यावर 37 नौसैनिक तैनात असून, पाण्यात 300 मीटर खोल जाण्याची तिची क्षमता आहे. 67 मीटर लांब, 6.2 मीटर रुंद व 12.3 मीटर उंच या पाणबुडीचे वजन 1,550 टन आहे. कलवरी वर्गातील दुसरी पाणबुडी आहे. या पाणबुडीमुळे 300 किमी अंतरापर्यंतच्या परिसरावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. रडार, सोनार, इंजिन व इतर 1 हजार लहान-मोठी उपकरणे यात देण्यात आलेली आहेत. 

समुद्रात गेल्यावर 12 हजार किमीपर्यंतचं अंतर पार करण्याची हिची क्षमता आहे.  पाण्याखालील युद्धामध्ये पाणबुडी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. कोणतेही नौदल, कोणत्याही बंदरावर हल्ला करू शकत नाही, पाणबुडी पाण्याखाली नेमक्या कोणत्या भागात आहे ही माहिती नसल्याने विरोधक शत्रूंची अडचण होते व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ती चांगली बाब असते.

टॅग्स :भारतीय नौदलराजनाथ सिंहसंरक्षण विभागमुंबई