खड्डे न बुजवल्यास अवमानतेची कारवाई

By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:32+5:302015-07-10T23:13:32+5:30

खड्डे न बुजवल्यास अवमानतेची कारवाई

Defective action will not be done if the potholes are not raised | खड्डे न बुजवल्यास अवमानतेची कारवाई

खड्डे न बुजवल्यास अवमानतेची कारवाई

्डे न बुजवल्यास अवमानतेची कारवाई
न्यायालयाने महापालिकेला खडसावले
मुंबई: खड्डे बुजवण्यासाठी देण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास यासाठी दोषी असणार्‍यांवर न्यायालयाच्या अवमानतेची कारवाई केली जाईल, असे उच्च न्यायालयाने महापालिका व एमएमआरडीएला शुक्रवारी खडसावले.
न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने मे महिन्यात या संदर्भात आदेश दिले होते. खड्डेमुक्त रस्ते हा नागरिकांचा मुलभूत अधिकार असून याची तक्रार करण्यासाठी विशेष टोल फ्री क्रमांक तयार करा, तसेच खड्डे बुजवण्यासाठी ठोस कालबद्ध कार्यक्रम तयार करा, असे आदेश न्यायालयाने पालिका, एमएमआरडीए व पोर्ट ट्रस्टला दिले.
या प्रकरणी सुनावणी शुक्रवारी खंडपीठासमोर झाली. यात पालिकेने यासाठी पावले उचलले असल्याचे न्यायालयाला सांगितले. मात्र ही तयारी समाधनकारक नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. तसेच यासाठी पालिका, एमएमआरडीए व पोर्ट ट्रस्टला अजून दोन आठवड्यांची मुदत दिली जात आहे. पण या कालावधीत ठोस कार्यक्रम न आखल्यास यासाठी जबाबदार असणार्‍यांवर न्यायालयाच्या अवमानतेची कारवाई केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Defective action will not be done if the potholes are not raised