Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत प्रत्येक वार्डात दहा हजार घरांमध्ये दिवे लावून साजरा करणार दीपोत्सव; आशिष शेलार यांची माहिती

By मनोहर कुंभेजकर | Updated: December 27, 2023 19:57 IST

भारतीय जनता पक्षाने प्रत्यक्ष राम मंदिराची लढाई लढली. त्यामुळे तो आमच्यादृष्टीने दिवाळीचा दिवस आहे.

मुंबई - भारतीय जनता पक्षाने प्रत्यक्ष राम मंदिराची लढाई लढली. त्यामुळे तो आमच्यादृष्टीने दिवाळीचा दिवस आहे. या निमित्ताने मुंबईतील प्रत्येक वॉर्डात प्रमुख मंदिरामध्ये मिलन कार्यक्रम दाखवणे, उत्सव साजरा करणे असे कार्यक्रम होतील. मुंबईतील प्रत्येक वार्डातील दहा हजार घरांमध्ये दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. याची तयारी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने केली जात आहे. दि,२२ जानेवारी नंतर प्रत्यक्ष राम मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घ्यावं म्हणून प्रत्येक विधानसभेतून एक विशेष ट्रेन करून सामान्य नागरिकांना भगवान रामाच्या दर्शनाला घेवुन जाणार आहोत अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

आशिष शेलार म्हणाले की, दि,२२ जानेवारी हा राम मंदिराच्या उद्घाटनाचा दिवस प्रत्येक हिंदूचे स्वप्न पूर्ण होण्याचा आहे. हजारो वर्षांच्या युद्ध  विराम देण्याचा आणि साधुसंतांच्या अपेक्षा पूर्तीचा दिवस आहे. विश्व हिंदू परिषदेचे सर्व कार्यकर्ते स्वर्गीय अशोक सिंघल यांच्या मेहनतीचे फळ दिसणारा दिवस आहे. संघ परिवाराने समाजाला जोडण्याचं परिश्रम केले त्याची सांगता आता होते आहे. ज्यावेळी सगळे लोक विरोध करत होते, यात्रा अडवत होते कारसेवकांवर गोळ्या घालत होते, अडवाणीजीना अटक करत होते, मोदीजी प्रमोद महाजन यांच्यावर कारवाई करत होते, कल्याण सिंग यांचे सरकार घालवत होते, त्यावेळी याची लढाई भारतीय जनता पक्ष लढला.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बोलताना  शेलार म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष यांची बैठक दि,२२ आणि दि,२३ तारखेला दिल्लीत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये पक्षाच्या आगामी कार्यक्रमाबद्दल अवगत केले. भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक राज्यांना केंद्रीय भारतीय जनता पार्टीने सर्वसमावेशक कार्यक्रम दिला आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी त्याची अंमलबजावणी कशी करायची त्यासंबंधी बैठका घेतल्या जात आहेत. कोर कमिटी त्यानंतर निवडणूक संचालन समिती मुंबई स्तरावर स्थापन करून बैठका पूर्ण करून मुंबई पदाधिकाऱ्यांच्या वार्ड स्तरापर्यंत बैठक घेण्याचे लक्ष आम्ही पूर्ण करत आहोत. 

मुंबईतील सहाही जागा महायुतीमध्ये आम्ही जिंकणार आहोत. जनतेचा आशीर्वाद मा. मोदीजींना आहे. येणाऱ्या काळात २०४७  पर्यंत भारत विकसित करण्याचं जे एक स्वप्न घेऊन भारत चालला आहे त्यासाठी जनतेकडून आशीर्वाद घेणार आहे. त्याकरिता २०४७ विकसित भारत या संकल्पनेला घेऊन मतदारापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :मुंबईआशीष शेलारराम मंदिर