अमरावती : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश शासनाला द्यावे, अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली.चित्रा वाघ यांनी दीपाली आत्महत्याप्रकरणी आतापर्यंतचा घटनाक्रम राज्यपालांसमोर ठेवला. दीपाली गर्भवती असताना जाणूनबुजून त्यांना त्रास देण्यात आला, त्यामुळे गर्भपात झाला. सहा, सात महिन्यांचा पगार थांबवून दीपाली चव्हाण यांची आर्थिक काेंडी करण्यात आली. वेळोवेळी अपमानित करण्यात आले. दीपाली यांना झालेल्या त्रासाची वेळोवेळी कल्पना रेड्डी यांना दिली होती, पण त्यांनी दुर्लक्ष केले. रेड्डी यांनी वेळीच लक्ष दिले असते, तर कदाचित दीपाली आज आपल्यामध्ये असती, असे वाघ म्हणाल्या. त्यामुळे रेड्डी याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली.
Deepali Chavan Suicide Case: भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली राज्यपालांंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 03:16 IST