Join us  

दीप प्रज्वलनाच्या आवाहनाला उंदड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 9:54 PM

विजेची मागणी अपेक्षेपेक्षा दुपटीने कमी : राज्यातील वीज पुरवठा अखंड ठेवण्यात यश : राज्याच्या विजेच्या ३२३२ मेगावॅट विक्रमी घट

मुंबई - पंतप्रधानांनी घरातील विजेचे दिवे बंद करून दीपप्रज्वलनाचे आवाहन केल्याने रविवारी रात्री ९ ते ९.१० या काळात राज्यातील विजेची मागणी १७०० मेगावॅटने कमी होईल असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात ही मागणी तब्बल ३२३२ मेगावॅटने घटली. मात्र, राज्यातील जलविद्यूत प्रकल्प आणि सेंट्रल एक्स्चेंजमधिल वीज पुरवठ्यात कौशल्यपुर्ण पध्दतीने ताळमेळ साधत महाराष्ट्र अंधारात बुडेल ही भीती राज्यातील वीज कंपन्यांनी खोटी ठरवली. 

रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी राज्यातील विजेची मागणी १३ हजार १५६ मेगावॅट होती. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यातील जवळपास सर्वच भागातील जनतेने आपल्या घरातील विजेचे दिवे बंद करून दीपप्रज्वलन केले. त्यामुळे ९ वाजता विजेची मागणी ११ हजार ३०६ मेगावॅट इतकी खाली घसरली. त्यानंतर या मागणीत ९ वाजून १० मिनिटांपर्यंत ९ हजार ९९४ इतकी विक्रमी घट झाली. ९ .२० वाजता ही मागणी पुन्हा १२,३१० आणि ९.३० वाजता १२, ११८ पर्यंत वाढली. वीज कंपन्यांच्या अपेक्षेपेक्षा ही घट जास्त असली तरी राज्य आणि केंद्रिय पातळीवरून ग्रीडमधिल फ्रिक्वेन्सीत कुठेही बिघाड झाला नाही. त्यामुळे राज्यातला वीज पुरवठा अखंड सुरू राहिला.

-----------------------------------------

कोयना जलविद्यूत प्रकल्पाची कमालराज्यातील विजेच्या मागणीतला हा चढ उतार कोयना जलविद्यूत प्रकल्पाच्या माध्यमातून कौशल्याने हाताळण्यात आला. शनिवारी रात्री ९ वाजता या प्रकल्पातून ५५३ मेगावॅट निर्मिती झाली होती तर, सेंट्रल एक्स्चेंजकडून ५०५७ मेगावॅट वीज घेतली होती. मात्र, रविवारी सेंट्रल एक्स्चेंजची वीज कमी करून कोयनाची वीज निर्मिती वाढविण्यात आली. ८ वाजून ५० मिनिटांनी कोयनेची वीज १८३२ मेगावॅटपर्यंत पोहचली होती. मागणी कमी झाल्यानंतर ९ वाजता ती ५५४ आणि ९ वाजून १० मिनिटांनी ४१४ पर्यत कमी करण्यात आली. ९ वाजून २० मिनिटांनी त पुन्हा १७३९ आणि ९ वाजून ३० मिनिटांनी १८०४ मेगावॅटपर्यंत पुन्हा वाढली. याच कालावधीत औष्णिक वीज प्रकल्पांतूनही आवश्यकतेनुसार वीज निर्मिती कमी- जास्त करण्यात आली. शनिवारी रात्री ९ वाजून १० मिनिटांनी सेंट्रल एक्स्चेजमधील वीज पुरवठा ५०५७ मेगावॅट होता. रविवारी त्याच वेळी तो ३०६० इतका कमी करण्यात आला होता. विजेची मागणी सुरळीत झाल्यानंतर त्यानंतर टप्प्याटप्प्याने कोयनेची वीज निर्मिती कमी करण्यात आली.

टॅग्स :भारनियमनकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या