गोराई सेक्टर २ येथील लसीकरण केंद्राचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:06 IST2021-05-14T04:06:07+5:302021-05-14T04:06:07+5:30

मुंबई - मुंबई काँग्रेस व उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेसतर्फे नागरिकांसाठी बोरीवली पश्चिम येथील गोराई सेक्टर २ येथे नवे लसीकरण ...

Dedication of Vaccination Center at Gorai Sector 2 | गोराई सेक्टर २ येथील लसीकरण केंद्राचे लोकार्पण

गोराई सेक्टर २ येथील लसीकरण केंद्राचे लोकार्पण

मुंबई - मुंबई काँग्रेस व उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेसतर्फे नागरिकांसाठी बोरीवली पश्चिम येथील गोराई सेक्टर २ येथे नवे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचे लोकार्पण गुरुवारी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

गोराई येथील लसीकरण केंद्रावर दररोज १०० डोस उपलब्ध असणार आहेत. नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे, तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती सोमवार ते बुधवार या दिवशी थेट केंद्रावर येऊन लसीकरण करू शकतात, त्यांना नोंदणीची गरज नाही, अशी माहिती भूषण पाटील यांनी दिली. लाेकार्पण साेहळ्याला मुंबई काँग्रेसचे खजिनदार भूषण पाटील, आर मध्य वॉर्डच्या सहायक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, स्थानिक काँग्रेस नगरसेविका श्वेता परब- कोरगावकर, मुंबई काँग्रेस सरचिटणीस संदेश कोंडविलकर, उपाध्यक्ष अशोक सूत्राळे, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष कालू बुधेलिया, मुंबई काँग्रेस सचिव मनोज नायर व राजेश निर्मल, महिला जिल्हाध्यक्ष प्रगती राणे, महासचिव कमलेश शेट्टी उपस्थित होते.

........................................

Web Title: Dedication of Vaccination Center at Gorai Sector 2