कांदिवलीच्या पावनधाम कोविड सेंटरचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:06 IST2021-04-18T04:06:33+5:302021-04-18T04:06:33+5:30
खासदार गोपाळ शेट्टी आणि सहयोगी संस्थेच्या वतीने गेल्या वर्षी सुरू केलेले पावन धाम कोविड सेंटर काही कारणास्तव बंद ...

कांदिवलीच्या पावनधाम कोविड सेंटरचे लोकार्पण
खासदार गोपाळ शेट्टी आणि सहयोगी संस्थेच्या वतीने गेल्या वर्षी सुरू केलेले पावन धाम कोविड सेंटर काही कारणास्तव बंद झाले होते. मात्र आज ते पुन्हा सुरू झाल्याने गरजू कोविड रुग्णांना त्याचा लाभ
होणार आहे.
या कोविड केअर सेंटरसाठी जैन संत गुरुदेव पूज्य नरेंद्र मुनी महाराज आणि गुरुदेव पूज्य जयविजय महासतीजी यांचे आशीर्वाद लाभले आहे. कवेस्ट फाउंडेशनच्या बिना बेन अजयभाई शेठ, पोयसर जिमखाना, तसेच बोरिवलीतील नामवंत रुग्णालय एपेक्स हॉस्पिटलचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
५० बेडच्या या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची सुविधा, ६ डॉक्टर, २ सल्लागार डॉक्टर आणि ३० जणांचा कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. दोन वेळचे जेवण,नाष्टा,चहा,काढा आदी सुविधादेखील येथे उपलब्ध आहे.
यावेळी आमदार सुनील राणे,भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, डॉ.योगेश दुबे, निरव दोशी, धवल वोरा, नगरसेवक कमलेश यादव, नगरसेवक प्रवीण शाह, नगरसेविका बीना दोशी, अशोक शाह, जिल्हा सरचिटणीस निखिल व्यास आणि संतोष सिंह सहित अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
----------------------------------------