मालाड स्टेशन ते भुजाले तलाव वातानुकूलित बस सेवा लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:10 IST2021-03-13T04:10:18+5:302021-03-13T04:10:18+5:30

मुंबई : मालाड स्टेशन ते भुजाले तलाव वातानुकूलित बस सेवेचे बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात ...

Dedication of air-conditioned bus service from Malad station to Bhujale Lake | मालाड स्टेशन ते भुजाले तलाव वातानुकूलित बस सेवा लोकार्पण

मालाड स्टेशन ते भुजाले तलाव वातानुकूलित बस सेवा लोकार्पण

मुंबई : मालाड स्टेशन ते भुजाले तलाव वातानुकूलित बस सेवेचे बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. गेली ३५ वर्षे खंडित असलेली ही बेस्ट बस सेवा शिवसेना विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या अथक प्रयत्नाने सुरू झाली. यासाठी सुर्वे यांनी प्रवीण शिंदे यांच्याकडे सतत पाच बैठका करून केलेल्या पत्रव्यवहार व पाठपुराव्यानुसार मालाड स्टेशन ते भुजाले तलावापर्यंत वातानुकूलित बस सेवा मंजूर करण्यात आली.

सुधाकर सुर्वे यांनी सांगितले की, अशी बेस्ट बस सेवा ३५ वर्षांपूर्वी सुरू केली होती. परंतु तांत्रिक कारणास्तव बंद पडलेली बेस्ट बस सेवा सुरू करण्यासाठी बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.

बेस्ट समितीचे अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी मालाड, कांदिवली विभागात एकूण २८ नवीन बेस्ट बस सेवा विभागप्रमुखांनी केलेल्या मागणीनुसार मंजूर केल्या आहेत. त्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. मालाड विभागात जास्त प्राधान्य देईन, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Dedication of air-conditioned bus service from Malad station to Bhujale Lake