आंबा उत्पादनात घट

By Admin | Updated: May 12, 2014 06:13 IST2014-05-12T06:13:16+5:302014-05-12T06:13:16+5:30

लांबत चाललेला पाऊस, उशिराने पडलेली व आधीच गायब झालेली थंडी या सगळ्याचा फटका इतर फळफळावळाबरोबरच फळांचा राजा अर्थात लाडक्या आंब्यालाही यंदा बसला आहे.

Decrease in mango production | आंबा उत्पादनात घट

आंबा उत्पादनात घट

बदलत्या वातावरणाचा फटका : यंदाही दर चढेच

राहुल वाडेकर, तलवाडा

निसर्गाचा वाढत चाललेला लहरीपणा, लांबत चाललेला पाऊस, उशिराने पडलेली व आधीच गायब झालेली थंडी या सगळ्याचा फटका इतर फळफळावळाबरोबरच फळांचा राजा अर्थात लाडक्या आंब्यालाही यंदा बसला आहे. यंदा आंब्याच्या झाडांना काहीसा उशिराच मोहोर आला शिवाय मध्येच वातावरण बदलल्याने त्याला पालवी आल्याने मे महिन्यात भरघोस येणारा आंबा यंदा बराच कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे मे महिन्यात तरी आंबा खायला मिळेल म्हणून बाजारात गेलेला गरीब ग्राहक मात्र पिशवी हलवतच माघारी परतत आहे. विक्रमगड तालुका व परिसरात १८३ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात आंबा बागायती केली जाते. गेल्या दोन चार वर्षापासून वातारणातील सातत्याने होणारा बदल यामुळे आंब्यांच्या झाडांचा मोहोर उशिरा आला. आला तोही लवकरच गेलेल्या थंडीनेही गळाला. उष्णतेतील वाढ व ढगाळ वातावरणाचा परिणाम आंबा उत्पादनावर होऊन आंब्याची बागायती धोक्यात आली. उशिराने फळ धरले आणि ते बाजारातही उशिराच येत असल्याने नुकसानच अधिक असल्याचे विक्रमगड तालुक्यातील खुडेद गावातील आंबा बागायतदार आनंद लक्ष्मण महाले यांनी लोकमतला सांगितले. लागवडही कमी ४विक्रमगड तालुक्यात १८३ हेक्टरहून अधिक क्षेत्रात आंबा लागवडीचे उत्पादन घेतले जाते़. ४विक्रमगड येथील आंबा बागायतदार शेतकरी महेश शांताराम पाटील,खुडेद येथील आनंद लक्ष्मण महाले हे शेतकरी दरवर्षी लाखो रुपयांचे आंब्यांचे उत्पादन घेत असून फायदा मिळवत आहेत, परंतु गेल्या दोन चार वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. गावरान आंबा दुर्मीळ ४आंब्याच्या उत्पादनासाठी पोषक वातारण मिळत नसल्याने गावरान आंबा यावर्षीही दुर्मिळ होणार आहे. ४गेल्या दोन-चार वर्षापासून जुनी आंब्यांची झाडेही कमी झालेली आहेत. ४शिल्लक राहिलेलीझाडेही फारशी उपयुक्त ठरत नाहीत. बाजारात दर अधिक ४दरवर्षी मे महिन्यात आंब्याचा दर २०० ते २५० रु. इतका होतो, मात्र यंदा हा दर ४०० रूपयापर्यंत असून तो अजूनही उतरण्याचे नावही घेताना दिसत नाही, शिवाय बाहेरून आंबे पिवळे वाटत असले तरी आतून ते सर्रास कच्चे असतात.

Web Title: Decrease in mango production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.