जोगेश्वरीत तरुणाचा कुजलेला मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:09 IST2021-08-29T04:09:34+5:302021-08-29T04:09:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: जोगेश्वरी परिसरात एका २७ वर्षांच्या तरुणाचा कुजलेला मृतदेह राहत्या घरी सापडला. त्यानुसार मेघवाडी पोलिसांनी याप्रकरणी ...

The decomposed body of a young man was found in Jogeshwari | जोगेश्वरीत तरुणाचा कुजलेला मृतदेह सापडला

जोगेश्वरीत तरुणाचा कुजलेला मृतदेह सापडला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: जोगेश्वरी परिसरात एका २७ वर्षांच्या तरुणाचा कुजलेला मृतदेह राहत्या घरी सापडला. त्यानुसार मेघवाडी पोलिसांनी याप्रकरणी घटनास्थळी धाव घेत तो शवविच्छेदनासाठी पाठविला असून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

जोगेश्वरीतील संत रोहिदासनगर येथे हा मुलगा राहत होता. त्याच्या घरी कोणी नव्हते. शेजाऱ्याला घरातून उग्र वास येऊ लागल्याने त्यांनी याबाबत मेघवाडी पोलिसांना कळविले. तेव्हा पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी दरवाजा तोडला. तेव्हा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांना दिसला. त्यांनी तो मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. सदर मृतदेह तीन दिवस पूर्वीचा असल्याची शक्यता असून त्यात अद्याप तरी काही संशयित बाब उघड झालेली नसून आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पिंपळे यांनी दिली. त्याने हे पाऊल का उचलले याचाही शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: The decomposed body of a young man was found in Jogeshwari