Join us  

फ्री व्हिसा देण्याबाबत घेणार लवकरच निर्णय , श्रीलंकेच्या पर्यटनमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 6:31 AM

गेल्या वर्षी श्रीलंकेत येणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी १८.२ टक्के म्हणजे ४ लाख २६ हजार भारतीय पर्यटक होते. २०१७ मध्ये ही संख्या ३ लाख ८३ हजार होती.

मुंबई  -  गेल्या वर्षी श्रीलंकेत येणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी १८.२ टक्के म्हणजे ४ लाख २६ हजार भारतीय पर्यटक होते. २०१७ मध्ये ही संख्या ३ लाख ८३ हजार होती. भारत हा देश श्रीलंकेसाठी मोठ्या भावाप्रमाणे असून, भारतीयांनी मोठ्या संख्येने पर्यटनासाठी यावे, असे आवाहन श्रीलंकेचे पर्यटनमंत्री जॉन अमरातुंगा यांनी केले.श्रीलंकेमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली असून, परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. देशात येणाºया प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी सरकार, प्रशासन तत्पर असून, कोणतीही दुर्दैवी घटना पुन्हा घडणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक यावेत, यासाठी राबविण्यात येणाºया ‘सो श्रीलंका’ या उपक्रमाची माहिती त्यांनी सोमवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. श्रीलंकेत येणाºया पर्यटकांना विनामूल्य व्हिसा देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.श्रीलंकेमध्ये जाणाºया पर्यटकांमध्ये भारतीयांचे स्थान गेल्या दशकभर प्रथम क्रमांकावर आहे. भारतातून भविष्यात मोठ्या संख्येने पर्यटक यावेत, यासाठी प्रयत्नशील असल्याचे अमरातुंगा यांनी स्पष्ट केले.यावेळी श्रीलंकेच्या मुंबईतील राजदूत चामरी रोड्रिगो म्हणाल्या, आमचा देश सुरक्षित असून, जगातील कोणताही देश दहशतवादी कारवायांपासून मुक्त नाही. मात्र, आम्ही पुरेशी काळजी घेतलेली आहे, प्रवाशांची सुरक्षा हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. काहीही झाले तरी पर्यटकांच्या केसालाही धक्का लागणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी बुद्धिका हेवावासम, विरांगा बंदरा, चिंथाका वीरसिंघे उपस्थित होते.श्रीलंकन एअरलाइन्सच्या विमानसेवेच्या माध्यमातून सध्या भारतातील १२ शहरे व श्रीलंकेदरम्यान १२३ साप्ताहिक उड्डाणे केली जात असून, श्रीलंका पर्यटन प्रोत्साहन मंडळाचे अध्यक्ष किशू जोम्स यांनी श्रीलंकेतील पर्यटन व्यवसाय व भारताचे श्रीलंकेसोबत असलेले नाते या संदर्भात यावेळी माहिती दिली.खर्चामध्ये ६० टक्क्यांपर्यंत सवलतश्रीलंकेत जाणाºया भारतीय पर्यटकांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. श्रीलंकन एअरलाइन्स, द हॉटेल्स असोसिएशन आॅफ श्रीलंका यांच्यातर्फे हे पॅकेज देण्यात येईल. श्रीलंकेमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तेथील पर्यटकांचा ओघ काहीसा घटला असल्याने, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण खर्चामध्ये ३० ते ६० टक्के सवलत देण्यात येणार आहे. यामध्ये हवाई प्रवास, वास्तव्य, वाहतूक व इतर सर्व सुविधांमध्ये सवलत देण्यात येणार आहे, असे अमरातुंगा यांनी सांगितले.

टॅग्स :श्रीलंकाभारत