मुंबईतील महाविद्यालयांचा निर्णय २२ फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:07 IST2021-02-14T04:07:20+5:302021-02-14T04:07:20+5:30

कोरोना रुग्णांची संख्या पाहून पुढील नियाेजन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरू केल्यानंतर कोरोनाबाधित ...

Decision of colleges in Mumbai postponed till 22nd February | मुंबईतील महाविद्यालयांचा निर्णय २२ फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर

मुंबईतील महाविद्यालयांचा निर्णय २२ फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर

कोरोना रुग्णांची संख्या पाहून पुढील नियाेजन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरू केल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अंशतः वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात याबाबत आढावा घेऊन रुग्णसंख्या कमी असल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मुंबईतील महाविद्यालये सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. २२ फेब्रुवारीआधी याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेने मुंबई विद्यापीठाला कळवले आहे.

मुंबई महानगर प्रदेशात महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आहे. पुढील आठवड्यात मुंबईतील बाधित रुग्णसंख्येत वाढ अथवा घट आहे का? याचा आढावा पालिका घेईल. रुग्णसंख्या कमी असल्यास मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत चर्चा करून महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय होईल. तशी माहिती २२ फेब्रुवारीपूर्वी कळविण्यात येईल, असे पालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांनी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांना पत्राद्वारे कळवले आहे.

Web Title: Decision of colleges in Mumbai postponed till 22nd February