Join us  

तो निर्णय BMC चा, तोडफोड प्रकरणाशी राज्य सरकारचा संबंध नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 3:16 PM

पवारांनी मिश्कील टिपण्णी केली होती. तसेच, या कारवाईचा राज्य सरकारशी कसलाही संबंध नसल्याचे पवार यांनी म्हटले.  

ठळक मुद्दे तो निर्णय बीएमसीचा आहे. बीएमसीने त्यांच्या नियम व अटींनुसार ही कारवाई केल्याचे पवार यांनी म्हटले.

मुंबई - अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद पेटला असताना या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही कंगनाने ओढले आहे. बीएमसीने कंगनाच्या अनाधिकृत कार्यालयावर हातोडा मारल्यानंतर पालिकेने २४ तासांत तत्परता दाखवत सुडबुद्धीने कारवाई केली असा आरोप विरोधकांनी केला होता. याप्रकरणाशी कंगना राणौतनेशरद पवारांचा संबंध जोडला होता. त्यावर, पवारांनी मिश्कील टिपण्णी केली होती. तसेच, या कारवाईचा राज्य सरकारशी कसलाही संबंध नसल्याचे पवार यांनी म्हटले.  

कंगनानं म्हटलं होतं की, महाराष्ट्र सरकारचे पेड सोर्स चुकीची माहिती पसरवत आहेत. बीएमसीने मला कुठेही नोटीस पाठवली नव्हती. माझ्याकडे सगळी कागदपत्रे होती, जी बीएमसीकडून मला नुतनीकरणासाठी देण्यात आली होती. कमीतकमी बीएमसीनं धेर्याने उभं राहिले पाहिजे आता खोटं का बोलत आहात? असा सवाल करत तिने ते पत्र पोस्ट केले होते. वास्तव म्हणजे बीएमसीने कंगनाच्या खार येथे फ्लॅट आहे त्याठिकाणी नोटीस पाठवली होती. ज्या बंगल्यावर बीएमसीने बुधवारी कारवाई केली त्या पाली हिल येथील मालमत्तेला कोणत्याही प्रकारे बीएमसीने नोटीस दिली नव्हती. यावरही जी नोटीस बीएमसीने पाठवली ती फक्त माझ्यासाठी नव्हती तर संपूर्ण इमारतीला होती. केवळ माझ्या फ्लॅटचा इश्यू नव्हता. या नोटिशीला त्या बिल्डरने सामोरे जाण्याची गरज आहे, ही इमारत शरद पवारांशी संबंधित आहे. आम्ही हा फ्लॅट त्यांच्या पार्टनरकडून विकत घेतला आहे. त्यासाठी ते उत्तरदायी आहेत असंही कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

कंगनाच्या या आरोपावर बोलताना शरद पवारांनी कंगनाचे नाव न घेता कोपरखळी मारली. माझी पण इच्छा आहे... माझ्या नावावर अशी कोणी बिल्डिंग करावी. अर्थात जे कोणी बोलत आहे त्या व्यक्तीकडून जबाबदारीने बोलण्याची अपेक्षा धरावी का..? हा प्रश्न आहे.', असे पवार यांनी म्हटले. तसेच, तोडफोड कारवाई प्रकरणात राज्य सरकारची कसलिही भूमिका नाही. तो निर्णय बीएमसीचा आहे. बीएमसीने त्यांच्या नियम व अटींनुसार ही कारवाई केल्याचे पवार यांनी म्हटले.

भीमा कोरेगाव प्रकरण

भीमा-कोरेगाव आणि एल्गार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्यात आला असला तरी, त्या तपासावर आपण समाधानी नाही. राज्य सरकार वेगळ्या पद्धतीने तपास करू शकते. राज्याला तो अधिकार आहे. या दृष्टीने आम्ही कायदेशीर तपासणी करत आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिली. 

नक्षलवादाच्या नावाखाली विचारवंतांना अटक

आम्ही एकूणच सगळ्या प्रकरणाबद्दल अस्वस्थ आहोत. गेले अनेक दिवस नक्षलवादाच्या नावाखाली विचारवंतांना अटक करून ठेवणे योग्य नाही. आज या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला आहे. एनआयए काय चौकशी करते ते पाहू, पण सरकारलादेखील काही अधिकार आहेत. त्या अनुषंगाने काय करता येईल याबद्दल तज्ज्ञांचे मत घेत आहोत. आज जो काही तपास सुरू आहे तो योग्य दिशेने सुरू नाही, असे आमचे मत आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईशरद पवारकंगना राणौत