Join us  

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष एक्स्प्रेस, काही गाड्यांना जादा डबे जोडण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 5:15 AM

गाडी क्रमांक ०१२६२ विशेष गाडी ४ डिसेंबरला रात्री ११.५५ वाजता नागपूरहून सुटेल. ही गाडी सीएसएमटीला दुसºया दिवशी दुपारी २.३५ वाजता पोहोचेल.

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे दाखल होतात. अनुयायांना दादर येथे येण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १२ अनारक्षित फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर ते सीएसएमटी या मार्गावर ३ फे-या, सीएसएमटी-दादर ते सेवाग्राम, अजनी, नागपूर या मार्गावर ६ फे-या, अजनी ते सीएसएमटी मार्गावर एक फेरी आणि सोलापूर ते सीएसएमटी या मार्गावर दोन फेºया धावणार आहेत, तर काही गाड्यांना जादा डबे जोडण्यात येणार आहेत.गाडी क्रमांक ०१२६२ विशेष गाडी ४ डिसेंबरला रात्री ११.५५ वाजता नागपूरहून सुटेल. ही गाडी सीएसएमटीला दुसºया दिवशी दुपारी २.३५ वाजता पोहोचेल.गाडी क्रमांक ०१२६४ विशेष गाडी ५ डिसेंबर रोजी नागपूरहून सकाळी ७.५० वाजता सुटेल. सीएसएमटीला त्याच रात्री १२.१० वाजता पोहोचेल.गाडी क्रमांक ०१२६६ विशेष गाडी नागपूरहून ५ डिसेंबरला दुपारी ३.५५ वाजता सुटणार आहे. ही गाडी सीएसएमटीला दुसºया दिवशी सकाळी ११.३५ वाजता पोहोचेल. या विशेष गाडीला अजनी, सेवाग्राम, वर्धा, फुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर या स्थानकांवर थांबा येईल.गाडी क्रमांक ०१२४९ सीएसएमटी-अजनी विशेष गाडी ६ डिसेंबरला दुपारी ४.०५ वाजता सीएसएमटीहून सुटेल. गाडी क्रमांक ०१२५१ सीएसएमटी-सेवाग्राम विशेष गाडी ६ डिसेंबरला सायंकाळी ६.४० वाजता सीएसएमटीहून सुटेल.गाडी क्रमांक ०१२५३ दादर-अजनी विशेष गाडी ७ डिसेंबरला रात्री १२.४० वाजता दादरहून सुटेल. गाडी क्रमांक ०१२५५ सीएसएमटी-नागपूर विशेष गाडी दुपारी १२.३५ सीएसएमटीहून सुटेल. तर गाडी क्रमांक ०१२५७ सीएसएमटी-नागपूर विशेष गाडी ८ डिसेंबरला सायंकाळी ६. ४० वाजता आणि गाडी क्रमांक ०१२५९ दादर-अजनी विशेष गाडी रात्री १२.४० वाजता अनुक्रमे सीएसएमटी, दादरहून सुटेल. या गाडीला दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामणगाव, फुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी या स्थानकांवर थांबा देण्यात येईल. गाडी क्रमांक ०२०४० अजनी-सीएसएमटी सुपरफास्ट गाडी ७ डिसेंबरला दुपारी ३ वाजता अजनीहून सुटेल. ही गाडी सीएसएमटीला दुसºया दिवशी पहाटे ५.१० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१३१५ सोलापूर-सीएसएमटी विशेष गाडी ५ डिसेंबरला सायंकाळी ५.२० वाजता सुटेल. ही गाडी सीएसएमटीला रात्री १.२० वाजता पोहोेचेल. गाडी क्रमांक ०१३१६ सीएसएमटी-सोलापूर विशेष गाडी ७ डिसेंबरला रात्री १२.२५ वाजता सुटेल. ही गाडी सकाळी १०.१० वाजता सोलापूरला पोहोचेल. या गाडीला कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण आणि दादर या स्थानकांवर थांबा देण्यात येईल.या गाड्यांना जादा डबे जोडण्याचा निर्णय५ डिसेंबरला भुसावळ-सीएसएमटी पॅसेंजर गाडीला सामान्य द्वितीय श्रेणीचे दोन डबे, सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजरला ७ डिसेंबर रोजी सामान्य द्वितीय श्रेणीचे दोन डबे, सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसला ५ आणि ६ डिसेंबरला सामान्य द्वितीय श्रेणीचा एक डबा जोडण्यात येणार आहे.

टॅग्स :रेल्वे